मनूवाद्यांचा माज .......!* 📚✍🏻 *युन्नूस तांबोळी, अकलूज*.

 *मनूवाद्यांचा माज .......!*
📚✍🏻 *युन्नूस तांबोळी, अकलूज*.



    *सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्यावर भिरकावलेला बुट ही भारतीय लोकशाहीला कलंकित करणारी बाब आहे*. 

     *लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्था आहे. सरन्यायाधीशावर हल्ला करण्याचा प्रयत्न हा केवळ न्यायव्यवस्थेवर हल्ला नाही तर आपल्या लोकशाहीच्या  संविधानाचा आणि राष्ट्राचाही घोर अपमान आहे*. 

    *देशाच्या न्यायाधीशावर सर्वोच्च न्यायालयात  बूट फेकून मारण्याचा केलेला प्रयत्न हा कोणी माथेफिरू  वकील नव्हता, तर तो ब्रेन वॉश झालेला वकील आहे. या देशात संविधानापेक्षा कोणीही मोठा नाही, संविधानापेक्षा हयांनासनातन धर्म मोठा वाटतो का? ह्यांची मानसिकता की माज ?याच अविचाराने गांधीजींचा खून झाला*. 

    *सत्य आणि अहिंसा च्या पायावर स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या महात्मा गांधींनी या देशाला व्यापक अधिष्ठान दिले. हा देश समतेच्या पायावर उभा आहे. वरचेवर समता धर्माच्या हातोड्याने खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला जातो, ही बाब देशाला घातक आहे*

       *न्यायव्यवस्थेतीलसर्वोच्च असणारे  व्यक्ती सुरक्षित नसेल तर इतरांचे काय ?हा न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा डावपेच हाणून पाडला पाहिजे*. 

    *न्याय संस्थेचा सन्मान आणि स्वातंत्र्य हेच आपल्या लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. या आधारस्तंभाला धक्का पोहोचण्याचा षडयंत्र असून ते लोकशाहीला घातक आहे*. 

    *लोकशाही शासन पद्धती आणि कायद्याचे राज्य या मनुवाद्यांना उलथवून टाकायचे आहे. या भारतीय लोकशाहीतील  प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहिले पाहिजे*. 

   *देशात असे लहान मोठे प्रकार सतत घडत असून ही देशासाठी चिंताजनक बाब आहे* . *धर्मांधांना खतपाणी  घालणाऱ्या विशिष्ट विचारांच्या व्यक्तीला पायबंद  घातला तरच भारतीय लोकशाही सुरक्षित राहील ,अन्यथा असेच प्रकार सुरू राहतील*.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.