सुजात आंबेडकर यांनी किरोडा येथील
पुराने बाधीत झालेल्या घराची पाहणी करून त्यांच्याशी संवाद साधला.
लोहा:-चंद्रकांत वाघमारे
तालुक्यात अतिवृष्टी होऊन अनेक घरांचे, शेतीचे, खरीप पिकांचे नुकसान झाले तसेच जनावरे दगावली.. किरोडा येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडवा द्वारे पाणी गावातील दलीत वस्तीत घुसून अनेकांच्या घराचे आणि जीवनावश्यक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले होते. पुराने बाधित झालेल्या घरांची पाहणी करून पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला. राज्य सरकारने ग्रस्त नागरिकांना तत्काळ आर्थिक मदत करावी. त्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे वंचीत चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
मुसळधार पावसाने व अतिवृष्टीने किरोडा मालगुजरी पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने तलाव ओव्हर प्लो होऊन गावातील दलीत बहुल वस्तीत पुराचे पाणी शिरल्याने एकूण २७ कुटुंब बाधित झाले होते. तर प्रकाश जोंधळे यांच्या शेळ्या मृत्यू पावल्या होत्या. अनेकांच्या शेती व पिकांचे नुकसान झाले.
बाधित घरांचे आणि शेतीचे स्वतः पाण्यात जाऊन पाहणी केली व पूरग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे वंचीत चे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले. तसेच किरोडा येथील ग्रामविकास अधिकारी श्रीमती स्वप्नाली राठोड /चव्हाण यांच्याशी प्रशासनाकडून होत असलेल्या उचित कार्यवाही संदभनि माहिती जाणून घेतली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, अविनाश भोसीकर, तालुकाध्यक्ष प्रमोद धूतमल, प्रा.राजेश ढवळे, बी. बी. गायसमुद्रे (डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त )राजाभाऊ बनसोडे, श्याम वाघमारे, विलास कांबळे, रत्नाकर महाबळे, धोंडीबा यानभुरे, बापूसाहेब कापुरे, समता सैनिक दलाचे सुभाष खाडे, सिद्धार्थ ससाणे, डोंगरे सह ग्रामस्थांची बहुसंख्येने उपस्थिती होती.
stay connected