आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात पोलीस ठाणे सोनखेड येथे बैठक संपन्न
सोनखेड :-चंद्रकांत वाघमारे
पोलीस ठाणे सोनखेड येथे आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,ग्रामपंचायत निवडणूक लक्षात घेता
पोलीस ठाणे सोनखेड हद्दीतील सर्व पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,सरपंच, माजी सरपंच ,पंचायत समिती आजी-माजी सदस्य ,जिल्हा परिषद आजी-माजी सदस्य तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती ,जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उत्सुक उमेदवार यांची
पोलीस ठाणे सोनखेड येथे
उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा मा.श्री शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन महत्त्वपुर्ण सूचना देण्यात आल्या.
निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्या साठी पोलीस विभाग तयार आहे मात्र जनतेचे आणि सर्व राजकीय पक्ष आणि गटाचे सहकार्य मिळाले तरच ही जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडता येणे शक्य आहे त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे आसे आवाहन सोनखेड पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री.माणे साहेब यांनी केले



stay connected