सरस्वती विद्यालय,आकुर्डी पुणे ,३५ शाळेत कन्यापूजन मोठ्या उत्साहात संपन्न.
आकुर्डी:~बुधवार दिनांक:१/१०/२०२५ रोजी,इयत्ता ५ वी ते ७ वी विद्यार्थिनीचे सरस्वती विद्यालय,आकुर्डी पुणे~३५ शाळेत कन्यापूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.कन्या पूजनेने नवरात्रीचा उपवास पूर्ण होतो आणि हे देवी दुर्गाच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलींची पूजा करण्याचे एक पवित्र कार्य आहे.यात मुलींना देवीचा दर्जा देऊन त्यांचे पूजन केले जाते,ज्यामुळे देवी प्रसन्न होते आणि घरात सुख,समृद्धी व यश प्राप्त होते,असे मानले जाते.अष्टमी आणि नवमी तिथीला हे पूजन केले जाते, ज्यामुळे नवरात्रीचे व्रत पूर्ण होते.या पूजनेने घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभता येते,तसेच कुटुंबाला सुख-समृद्धी प्राप्त होते.तसेच, समाजातील मुलींबद्दल आदर वाढतो आणि त्यांच्याप्रती असलेला सकारात्मक दृष्टिकोन दृढ होतो.या पूजनात साधारणपणे २ ते १० वर्षांच्या मुलींना बोलावले जाते.या मुलींना देवी दुर्गाच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कन्या मानले जाते.याच सोबत,महात्मा गांधी जयंती,लाल बहादूर शास्त्री जयंती व विजयादशमी ही मोठ्या उत्साहात साजरी केली गेली.इयत्ता सातवी मधील कुमोद माने व दिव्या सोळंके या विद्यार्थिनीने तसेच वर्गशिक्षिका सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी कन्या पूजन सोबत,लाल बहादूर शास्त्री जयंती,महात्मा गांधी जयंती व विजादशमीचे महत्त्व सांगितले.सर्व मुलींचे औक्षण,पूजन करून त्यांना डोक्याचे पांढरे पट्टे ,खाऊ म्हणून म्हैसूर पाक देवून कन्या पूजन साजरे केले गेले.मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.यासाठी शाळेतील सौ.प्रतिमा काळे,सौ. सविता पाटील,सौ.कल्पना उभे मॅडम,सौ.सुकन्या मॅडम,श्री.प्रशांत चव्हाण,श्री.कैलास कोशिरे व श्री.चतुर आखाडे सरांनी नियोजन केले.
stay connected