आष्टी तहसीलच्या नायब तहसीलदारपदी सोमेश मोहिते यांची नियुक्ती
आष्टी। प्रतिनिधी
तहसील कार्यालयात गेल्या एक दिड महिन्यांपासून निवासी नायब तहसीलदार पद रिक्त होते त्या जागी सोमेश सतेज मोहिते यांची निवासी नायब तहसीलदार या पदासाठी शासनाने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोमेश मोहिते हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तळबीड येथे राहणारे असून, त्यांनी राज्यसेवा परीक्षा २०२२ मध्ये तहसीलदार पदासाठी यश मिळवले होते. नियुक्तीपूर्वी, त्यांनी मुंबई येथील मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून
कार्यरत होते. सध्या त्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणार्थी काल-विधीसाठी आष्टी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार पदी नियुक्त करण्यात आले आहे. सोमेश मोहिते यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे तहसीलदार वैशाली पाटील, नायच तहसी-लदार अश्विनी पडोळे, नायब तह-सीलदार प्रकाश सिरसेवाड, नायब तहसीलदार भगिरथ धारक यांसह तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी थ आदींनी त्यांचे स्वागत केले व यशस्वी कारकीर्दच्या शुभेच्छा दिल्या.
stay connected