वीर साम्राज्य ग्रुप अकलूज यांचे वतीने दीपावली पाडव्याच्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

 वीर साम्राज्य ग्रुप अकलूज यांचे वतीने
दीपावली पाडव्याच्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन




वीर साम्राज्य ग्रुप अकलूज यांचे वतीने गेली पंधरा वर्षे दीपावली पाडव्याच्या निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून अकलूज येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर विनोद मगर व डॉक्टर प्रिया मगर यांच्या डॉक्टर मगर बाळ रोग तज्ञ हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात 100 रक्तदात्यांनी रक्तदान केले केवळ एकतेतून  सेवा, सेवेतून प्रेरणा, रक्तदानातून मानवतेचा सन्मान,असा उद्देश रक्तदान शिबिराचा होता.

    वीर साम्राज्य ग्रुप यांनी गेली पंधरा वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवली असून यात आषाढी वारीतील वारकरी भाविकांना अन्नदान व मोफत औषधे वाटप वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, कोरोना काळात रुग्णांना मोफत औषधोपचार,सध्याच्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाई म्हणून कपड्यांचे अन्नधान्यांचे पाकीट वाटप, महिलांसाठी आरोग्य शिबिर विद्यार्थी दत्तक योजना असे विविध सामाजिक उपक्रम राबविणारा  वीर साम्राज्य ग्रुप आहे. समाजासाठी झटणारा ग्रुप म्हणून वीर साम्राज्य ग्रुप ची सर्वत्र ओळख आहे. 

       या वीर साम्राज्य ग्रुप मधील विद्यार्थी समाजसेवा करत असताना नोकरीत देखील उज्वल हे संपादन केलेले आहेत यात स्वप्निल कुलकर्णी अभियंता नगरपालिका, सुनील कुमार  मदभावी पोलीस, हनुमान काळे आरोग्य सेवक,डॉक्टर मगर पायलट, शिवाय रंजीत कागदे या विद्यार्थ्यांनी पीएचडी संपादन केलेली आहे असा हा वीर साम्राज्य ग्रुप सर्वत्र समाजसेवेसाठी धडपडणारा ग्रुप म्हणून परिचित आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.