आष्टी मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांसाठी आ.सुरेश धस यांचा जलसंपदा मंत्र्यांकडे महत्त्वपूर्ण पाठपुरावा

 आष्टी मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांसाठी आ.सुरेश धस यांचा जलसंपदा मंत्र्यांकडे महत्त्वपूर्ण पाठपुरावा

*****************************

पूरग्रस्त प्रकल्पांसाठी तातडीची मान्यता

*****************************



आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी विधानसभा मतदारसंघातील सिंचनासंबंधी प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीसंबंधी ना.राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा खोरे मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सुरेश धस यांनी मतदारसंघातील महत्वाकांक्षी आणि अत्यंत गरजेचे सिंचन प्रकल्प सविस्तरपणे सादर केले.

       आष्टी मतदारसंघ हा दुष्काळी भागात मोडतो आणि या भागातील सिंचन प्रकल्पांमध्ये उशीरामुळे शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत अडचणी येत आहेत. यामुळे आमदार सुरेश धस यांनी आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांसाठी सिंचन प्रकल्प राबवण्याची आग्रही मागणी केली.

सांगवी संगमेश्वर, सांगवी नागापूर, खडकत १ आणि खडकत २ को. प. बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतरण करण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. करंजी प्रकल्पातील अतिरिक्त पाणी पांढरी गावापासून जामगाव दत्त मंदिर पाणलोट क्षेत्रापर्यंत सोडण्यासाठी नवीन कॅनॉल निर्मितीसाठी सर्वेक्षण,सिना नदीपात्रातून लोणी गावाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाणी सोडण्यासाठी नवीन उपसा योजना,सिना धरणांमधून पिंपरी घुमरी साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी उपसा योजना,खडकत को. प. बंधाऱ्याचे वाहून जाणारे पाणी खडकत साठवण तलावात सोडणे,सीना मध्यम प्रकल्पातील डावा कालव्याची दुरुस्ती,अहिल्यानगर तालुक्यातील पारगाव तलावापर्यंत कॅनॉलची दुरुस्ती,आष्टी तालुक्यातील कांबळी, कडी व कडा मध्यम प्रकल्पांसाठी विशेष दुरुस्ती व वित्तीय तरतूद,

पाटोदा तालुक्यातील सौताडा साठवण तलावातून पूल व रस्त्यांचे काम, लांभरवाडी साठवण तलावातील अतिरिक्त पाणी सोडणे, अंतापूर साठवण तलावासाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र, महासांगवी प्रकल्पाची उंची वाढवणे, तसेच प्रकल्पांवरील कालव्याचे काँक्रीटीकरण व दुरुस्ती करणे.

शिरूर (का.) तालुक्यातील सिंदफना मध्यम प्रकल्पाची उंची वाढवणे व कालव्यांचे रूपांतरण, आनंदगाव पद्मावती देवी तलाव क्र. २ चे खोलीकरण व उंची वाढविणे, तसेच बेलपारा प्रकल्पाद्वारे अतिरिक्त पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करणे.विशेष म्हणजे, मतदारसंघात मागील पंधरा दिवसापासून झालेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे अनेक साठवण तलाव, मध्यम प्रकल्प व कालव्यांना नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी मंत्री महोदयांना तातडीने दुरुस्ती व रब्बी हंगामासाठी पाणी साठवण्याची विशेष आर्थिक तरतूद करण्याची विनंती केली. मंत्री महोदयांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन मान्यता दिली.



       आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार) या तिन्ही तालुक्यांमधील जलसंपदा, जलसंधारण प्रकल्प आणि जिल्हा परिषदेच्या मालकीतील अनेक केट वेअरच्या दरवाजे अतिवृष्टीमुळे वाहून गेले आहेत.१५ ऑक्टोबर नंतर या गेटांची पुनर्स्थापना सुरू करण्याची आवश्यकता असल्यामुळे तात्काळ ७ दिवसांच्या कालावधीत निविदा काढून नवीन गेट खरेदी करण्याची मागणी जलसंपदा मंत्री

राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्याकडे केली. मंत्री महोदयांनी देखील या मागणीला त्वरित सकारात्मक प्रतिसाद देऊन खरेदीस मान्यता दिली.


याचबरोबर, शिरूर (कासार) तालुक्यातील घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्पाचे तलाव किना नदीला आलेल्या पुरामुळे गंभीर नुकसान झाले आहे. या तलावाची की-वॉल पुढे वाढवून दोन्ही संरक्षण भिंती उभारणे, कॅनॉलची दुरुस्ती करणे आणि माळेगाव चखला गावापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली. यासंबंधीचे सविस्तर अंदाजपत्रक मागविण्यासाठी तात्काळ आदेश  मंत्री महोदयांनी दिले आहेत.

या बैठकीत मुद्द्यांवर विशेष चर्चा होऊन आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासंबंधी गंभीर अडचणी दूर होण्याची आशा निर्माण झाली असून, आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प वेळेत राबविण्याची दिशा ठरली आहे.

या बैठकीस अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर,कार्यकारी संचालक गुणाले, जलसंपदा विभाग मुख्य अभियंता चोपडे साहेब, 

कृष्णा मराठवडा मंडळ अधीक्षक अभियंता भारत सिंगाडे, अधीक्षक अभियंता थोरात,

धाराशिव कार्यकारी अभियंता खड्डे, संभाजीनगर गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, कार्यकारी संचालक तिरमनावर, बीड मुख्य अभियंता जगताप मॅडम,अधीक्षक अभियंता, कुकडी सिंचन मंडळ

जगताप मॅडम,अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे मंडळ रहाटकर मॅडम,उपअभियंता

नखाते आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.