आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने..
आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील 15 कोटी 42 लक्ष ते 30 हजार रु. किमतीच्या 04 पूलांच्या बांधकामास मंजुरी..
अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली...
नागरिकात आनंद व्यक्त..
आष्टी ( प्रतिनिधी ) आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी आणि पाटोदा तालुक्यातील अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या 04 ठिकाणी 15 कोटी 42 लक्ष 33 हजार रु.किमतीच्या पुलांच्या बांधकामास मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली आहे..
गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी पूल बांधकाम करण्याची आवश्यकता असल्यामुळे या गावांच्या परिसरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे..
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने दि.30/09/2025 रोजी शासन निर्णया द्वारे या कामास मंजुरी देण्यात आली आहे..
आष्टी तालुक्यातील..
1) राज्यमार्ग क्र.54 शिराळ ते हनुमंतगाव इजिमा क्र.107 ते टाकळसिंग या रस्त्यावर पूलाचे बांधकाम किंमत 06 कोटी 36 लक्ष 18 हजार रु.
2) आष्टी ते भातोडी या रस्त्यावर पूलाचे बांधकाम किंमत 02 कोटी 60 लक्ष 12 हजार रू.
3 )राज्यमार्ग क्र.651 ते वाघळूज या रस्त्यावर पूलाचे बांधकाम किंमत 03 कोटी 46 लक्ष 82 हजार रू.
आणि पाटोदा तालुक्यातील..
1) राज्यमार्ग क्र.561 ते रोहतवाडी-घाटेवाडी- अडसूळवस्ती बेनसूर या रस्त्यावर पूलाचे बांधकाम किंमत 02 कोटी 98 लक्ष 81 हजार रु.असे एकूण 15 कोटी 42 लक्ष 33 हजार रु.किमतीच्या 04 पूलांच्या बांधकामास मंजुरी मिळाली आहे..
अशी माहिती बांधकाम विभागाचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी दिली आहे..
या चारही ठिकाणी नागरिकांना रहदारी आणि वाहतुकीसाठी अडचणी निर्माण होत असत या चारही पूलांच्या बांधकामास मंजुरी मिळाल्यामुळे सर्व संबंधित गावातील नागरिक, शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करून कार्यतत्पर आमदार सुरेश धस यांचे आभार मानले आहेत
stay connected