MDRT विमा प्रतिनिधी कांतीलाल पानसरे यांनी पुणे विभागात मिळवले प्रथम स्थान
L.I.C पॉलिसी वरील G.S.T रद्द झालेल्या तारखेच्या पहिल्याच दिवशी नवीन विमा पॉलिसी दाखल करून संपूर्ण पुणे विभागात प्रथम
स्थान मिळवल्याबद्दल कांतीलाल पानसरे यांचा सन्मान शुक्रवार दि . 26 रोजी पुणे डिवीजन ऑफिस येथे करण्यात आला . यावेळी सन्मान स्वीकारताना (SDM) वरिष्ठ मंडळ प्रबंधक श्री संदीप गोखे साहेब , मार्केट मॅनेजर श्री जयवर्धन साहेब व पुणे डिव्हिजनचे सर्वच अधिकारी वर्ग उपस्थित होते . हे यश संपादन करत असताना सिंहाचा वाटा असणारे कांतीलाल पानसरे यांचे मार्गदर्शक (DO) डेव्हलपमेंट ऑफिसर गुरुनाथ पवार साहेब,अहिल्यानगर 954 शाखेचे चीप मॅनेजर सुरेश गायकवाड साहेब ,उपशाखा अधिकारी देशपांडे साहेब नवीन व्यवसाय, सेल्स, अकाउंट, कॅश काऊंटर या शाखेतील सर्वच कर्मचारी सहकारी मित्र आणि सर्व विमाधरक परिवार यांचे पानसरे यांनी आभार व्यक्त केले . त्यांच्या यशाबद्दल आष्टी तालुक्यातील सर्व मित्रपरिवाराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला .
stay connected