दूध उत्पादकांनी भ्रूण प्रत्यारोपण या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवावी..
---- आ.सुरेश धस
परराज्यातील प्रजातीबाबत युवकांनी सजग राहून फसवणूक टाळावी...
--- अरविंद पाटील
आष्टी ( प्रतिनिधी )
दूध उत्पादक शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भ्रूण प्रत्यारोपण या नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच गोठ्यात नवीन प्रजाती निर्माण करून जास्तीत जास्त दूध उत्पादन होईल यासाठी प्रयत्न करावेत... असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले..
तसेच महाराष्ट्रातील तरुण दूध उत्पादन व्यवसायाकडे येत आहेत परंतु त्यांनी सोशल मीडियावरील माहितीवरून परराज्यातून गाई म्हशींच्या बाबत या माहिती आधारे आर्थिक गुंतवणूक करू नये त्यातून फसवणूक होण्याचे अनेक उदाहरणे घडली आहेत त्यामुळे त्यांनी सजग राहून फसवणूक टाळावी.. असे आवाहन कोल्हापूर येथील वाय.टी.पाटील डेअरी फार्म चे संचालक अरविंद पाटील यांनी केले..
आष्टी तालुका दूध उत्पादक व पुरवठा सहकारी संघ यांचे वतीने आयोजित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना आमदार सुरेश धस आणि अरविंद पाटील बोलत होते..
या वेळी प्रास्ताविक डॉ. जालिंदर वांढरे,डॉ. मंगेश ढेरे पशुधन विकास अधिकारी यांनी केले.यासह पशु प्रजननातील अद्यावत तंत्रज्ञान, भ्रूण प्रत्यारोपण याबाबत डॉ. विष्णू जवणे ( पशुधन विकास अधिकारी पुणे) यांनी उपस्थित पशुपालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर श्री. शांतीलाल भोसले, चेअरमन -तालुका दुध उत्पादक संघ,
श्री.रंगनाथ धोंडे माजी नगराध्यक्ष यांचेसह दूध संघाचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते...
पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की,
आष्टी मतदार संघात या पूर्वी दूध व्यवसाय कमी प्रमाणात होता परंतु आष्टी तालुका दूध संघाच्या योग्य धोरण व सकारात्मक निर्णयामुळे आज आष्टी तालुका दोन लाख लिटर्स पेक्षा जास्त दूध उत्पादन करण्यामध्ये अग्रेसर झालेला असून तालुक्यातील शेतकरी नवनवीन गाई व म्हशींच्या प्रजातीचे पालन करत जास्तीत जास्त दूध उत्पादन करण्याकरिता वेगवेगळ्या प्रयोग करत आहेत, त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांनी गाई व म्हशींची प्रजननातील अद्यावत तंत्रज्ञान सेक्स सोर्टेड सिमेन्स (भ्रूण प्रत्यारोपण) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गाई व म्हशींची दूध उत्पादकता वाढवावी यासह दूध उत्पादकता वाढवण्याबरोबरच ब्रीडिंग मॅनेजमेंट करून नवीन प्रजातीच्या गाई निर्माण करणे आवश्यकता आहे... त्यासाठी पशूला मुरघास याचबरोबर ओला -चारा व मॉइश्चर मिक्सर यासह शुद्ध पाणी व वेळेवरती औषध उपचार या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत त्याकरिता सर्व शेतकऱ्यांनी जागरूक व सजत राहणे आवश्यक आहे यासह येणाऱ्या काही काळामध्ये ब्रीडिंग व डेअरी फार्म च्या माध्यमातून मतदार संघामध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवून नवतरुणांना या क्षेत्रामध्ये आकर्षित करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनुष्यबळ कमी वापरून जास्तीत जास्त आर्थिक फायदा शेतकऱ्यांना व पशुपालकांसह नव तरुणांना फायदा होईल याकरिता सकारात्मक धोरण घेण्याचे सांगितले.
stay connected