*सर्व सामान्य ऊसतोडणी कामगार यांचा मुलगा चि. मिनिनाथ घुले याचा MBBS ला प्रवेश*
आष्टी तालुक्यातील मुळचे कारखेल खुर्द येथील व सध्या म्हसोबाची वाडी येथील रहिवाशी असणारे संभाजी रघुनाथ घुले यांचे चिरंजीव मिनीनाथ संभाजी घुले हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आजोबा ऊसतोडणी कामगार व वडीलांनी देखील ऊस तोडून, ड्रायव्हर म्हणून काम केले आहे व आजही वडील बस चालक म्हणून काम करत आहेत. मिनीनाथ याचे प्राथमिक शिक्षण म्हसोबाचीवाडी येथे झाले असून पुढील शिक्षण वृद्धेश्वर विद्यालय गौखेल येथे झालेले आहे 11/12वी धानोरा येथे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे झाले असून कोणतेही खाजगी क्लास नसताना त्याने अभ्यास करून आपला MBBS चा प्रवेश निश्चित केल्याबद्दल त्याचे सर्व शिक्षक बांधव भगिनी व पंचक्रोशीतील बंधू भगिनी व हितचिंतक नातेवाईक यांच्याकडून अभिनंदन आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे
stay connected