मराठवाड्यातील कोळी महादेव, कोळी टोकरे, कोळी मल्हार समाजाच्यावतीने बेमुदत उपोषण-व्यंकट मुदिराज
नांदेड - मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यातील 77 तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, तत्सम आदिवासी जमातींच्या जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राबद्दल होणाऱ्या अडवणुकी संबंधाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आद्यकवी महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच दि.7 ऑक्टोबर 2025 मंगळवार रोजी पासून सकल आदिवासी कोळी महादेव जमातींच्या मागण्या पुर्ण होईपर्यंत बेमुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, तरी या मागण्यासाठीच्या उपोषणास तमाम आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपोषणकर्ते व्यंकट मुदिराज, प्रभाकर केंगल, सुरेश बोईने, सत्यनारायण मुदिराज, सत्यनारायण खेळगे, शंकर मुदिराज, सत्यनारायण मामीलवाड यांनी केले आहे.
समाजाचे प्रमुख मागण्या म्हणजे ः मराठवाड्यातील 77 तालुक्यातील आदिवासी कोळी महादेव, कोळी टोकरे, कोळी मल्हार या जमातींचे प्रलंबीत प्रमाणपत्र तात्काळ द्यावे, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती छत्रपती संभाजीनगर व किनवट विभाग समितीतील प्रलंबीत वैधता प्रमाणपत्र तात्काळ निकाली काढावे, मेडिकल, इंजिनिअरिंग, उच्च शिक्षणास ओबीसी, एसी प्रमाणे जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सहा महिन्याची मुदत अनुसूचित जमातीलाही लागू करावी, हैद्राबाद गॅझेटियरनुसार कोळी जमात यास अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठीचे मंत्रीमंडळाचे निर्णय केंद्र सरकारकडे पाठवावे, उत्तरप्रदेश सरकारच्या निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र शासनानेही आद्यकवी महर्षी वाल्मीकी ऋषी जयंतीनिमित्त सार्वजनिक शासकीय सुट्टी जाहिर करावी या व ईतर मागण्यासाठीच्या उपोषणास समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन व्यंकट मुदिराज, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, पुंडलिक मोरे, सत्यनारायण मुदिराज, सुरेश बोईने, सत्यनारायण खेळगे, शंकर मुदिराज, सत्यनारायण मामीलवाड आदींनी केले आहे.
वरील सर्व मागण्यांचे निवेदन दि.29 सप्टेंबर 2025 सोमवार रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांना महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यासाठी उपरोक्त शिष्टमंडळाने निवेदन दिले.
------------------------------------------------------------
stay connected