उद्योजकांसाठी विशेष GeM पोर्टल कार्यशाळा – नवउद्योजकांसाठी संधीचे नववर्ष

 🌟 उद्योजकांसाठी विशेष GeM पोर्टल कार्यशाळा – नवउद्योजकांसाठी संधीचे नववर्ष 🌟



अहिल्यानगर – महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या पुढाकाराने जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर मध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यशाळेत GeM (Government e-Marketplace) पोर्टलविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम MSME क्षेत्रातील नवउद्योजक व महिला उद्योजकांना शासकीय खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सशक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.



कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शन टेंडरवाला चे संचालक इंजि. विनोद मोटे यांनी केले. त्यांनी GeM पोर्टलवर नोंदणी करण्यापासून उत्पादनांची नोंद, टेंडर प्रक्रिया, खरेदी-विक्रीचे नियम, तसेच शासकीय खरेदी प्रक्रियेत MSME उद्योजकांना मिळणाऱ्या विविध लाभांवर प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्ट मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित उद्योजकांना ऑनलाईन शासकीय खरेदी प्रक्रियेसाठी व्यवहारिक टिप्स व रणनीती दिल्या गेल्या.


कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर महिला व युवक उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सहभागी उद्योजकांनी GeM पोर्टलवरील व्यवहार प्रक्रियेतील विविध अडचणी, संधी व त्यावर मात करण्याचे मार्ग विचारले. इंजि. विनोद मोटे यांनी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर उत्तर देऊन उपस्थितांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास प्रवृत्त केले.



या उपक्रमाचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर चे श्री. रमेश जाधव साहेब यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध सरकारी अधिकारी, उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच सामाजिक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले व नवउद्योजकांना MSME क्षेत्रात प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला.


कार्यशाळेच्या माध्यमातून सहभागी उद्योजकांना सरकारच्या डिजिटल खरेदी प्रक्रियेत सामील होण्याची व नवसंधी शोधण्याची संधी मिळाली आहे. हे मार्गदर्शन त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे आयोजकांनी नमूद केले.


🌼 आगामी काळातही अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्धार असून, उद्योजकता क्षेत्रात नवउद्योजक व MSME उद्योगांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सदैव पुढे राहणार आहे, असे प्रतिपादन करण्यात आले.
इंजि. विनोद मोटे
संचालक, टेंडरवाला



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.