एन डी आर एफ देवदूतांच्या मदतकार्यामुळे पूरग्रस्तांमध्ये कृतज्ञ भावना..I
आ.सुरेश धस यांच्या वतीने आभार व्यक्त
आष्टी (प्रतिनिधी)
पाथर्डी तालुक्यातील झालेल्या ढगफुटीमुळे कडी नदीला आलेल्या पुरामुळे कडा,टाकळी आमिया, टाकळीसिंग,सांगवी आष्टी या सर्व गावांमध्ये नदी च्या काठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पाण्याने वेढले असताना एनडीआरएफ च्या देवदूतांनी प्राणांची बाजी लावून तालुक्यातील नागरिकांचे प्राण वाचवले आहेत त्याविषयी सर्व पूरग्रस्तांनी कृतज्ञता व्यक्त केली असून आमदार सुरेश धस यांनी या देवदूतांचे आभार मानले रविवारी रात्री सोमवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पीके वाहुन गेली शेतजमिनी खरडून गेल्या तसेच अनेक नागरिक पुरामध्ये अडकले
नद्यांची पाण्याची पातळी एवढी वाढली की पूर परिस्थिती निर्माण झाली नदीकाठची लोक पुरा मध्ये अडकली गेली त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर द्वारे एअरलिफ्टिंगच्या पर्यायाशिवाय कोणताही पर्याय नसल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याशी फोनवर संवाद करून या सर्व पूर परिस्थितीचा आढावा दिला. मग शासन स्तरावर मोठ्या वेगाने हालचाली झाल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मदत पुनर्वसन मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील संपर्क करून आमदार सुरेश धस यांनी अहिल्यानगर येथील आर्मी व एन डी आर एफ च्या टीम ने त्यांना हेलिकॉप्टर साह्याने पुरामध्ये अडकलेल्या लोकांना आपल्या हेलिकॉप्टरच्या द्वारे सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले अशा भयानक परिस्थितीमध्ये शासन दरबारी व महाराष्ट्र सरकारकडे मोठ्या जलद गतीने पाठपुरावा केल्याने आर्मी एनडीआरएफ ची टीम व त्या टीम मधील आर्मीचे व इंडियाच्या जवानांनी मोठ्या हिमतीने अडकलेल्या जवळपास शेकडो लोकांचे प्राण वाचवण्याचे काम या आर्मीतील जवान व इंडिया मधील जवान यांनी काम केल्याने हेलिकॉप्टर च्या द्वारे ज्यावेळी या लोकांना आपल्यासमोर मृत्यू दिसत होता. त्या मृत्यूच्या गुहेतुन बाहेर काढून आपल्या कुटुंबात आणले त्यावेळी त्यांनी आमदार सुरेश आण्णा धस यांच्यापाशी आपली भावना व्यक्त करताना त्यांचे अश्रू अनावर झाले व ते म्हणाले अण्णा तुम्ही आमच्यासाठी खरंच देवदूत बनून आलात आमदार सुरेश अण्णांचे आर्मीच्या जवानांचे देखील त्यांनी हात जोडून आभार मानले. आष्टी तालुक्यामध्ये या झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात शेतीचे शेत पिकाचे घरी पडली, कुणाचे शेत वाहून गेले ,तर कोणाच्या दुकानात पाणी शिरल्याने त्याचे लाखोचे नुकसान झाले शेतकरी शेतपिके वाहून गेल्याने हवानदील झाला आहे. अशा या परिस्थितीमध्ये तातडीने सर्व ठिकाणचे पंचनामे करण्याची उप जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठका घेऊन आमदार सुरेश धस यांनी सूचना करून लवकरात लवकर सर्व नुकसान ग्रस्तांचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा अशा सूचना दिल्या आहेत
stay connected