लोहा कंधार परिसरात ओल्या दुष्काळाची सावट कायम बळीराजा चिंताचूर राजकीय नेते मात्र बे फिकीर
.........................
जगाचा पोशिंदा उपाशी..! राजकीय नेता तुपाशी
..,............
लोहा: - चंद्रकांत वाघमारे
.........................
लोहा कंधार तालुक्यात गेल्या चार पाच वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे ओल्या दुष्काळाची तर कधी कोरड्या दुष्काळाचे सावट कायम राहिल्यामुळे शेतकरी राजा मेटा कुटीला आला असल्या मुळे हतबल झाल्याचे दिसत आहे त्यामुळे काही ठिकाणी कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवित आहेत असे संताप जनक प्रकार काही ठिकाणी घडत आहेत याकडे मात्र राजकारकीय जाणून बुजून राजकारण कानाडोळा करीत आहेत मागील विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्याचे आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्या ना कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेमध्ये दिले होते परंतु सरकार सत्तेवर येतात त्यांनी कर्जमाफीची केलेली घोषणा विसरून गेल्याचे दिसत आहे त्यामुळे शेतकरी वर्गात सरकार विषयी नाराजीचा सूर दिसून येत आहे यावर्षी संपूर्ण देशात वरून राज्याच्या अवकृतीमुळे पर्जन्यमान परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे नांदेड जिल्ह्यात देखील पावसाने थैमान घातल्यामुळे जिल्ह्यातील जिल्ह्यातील खरिपाची पिके धोक्यात आली आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे सध्या संपूर्ण राज्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली आहे तरी सरकार या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आज तरी दिसत आहे काही नेते मंडळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेऊन दौरे करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत एकेकाळी नांदेड जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब यांचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता त्यावेळी प्रशासनातील अधिकारी देखील इमानेइतबारे कर्तव्य बजावीत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न वेळेवर सुटत असत त्यामुळे त्यांचा जनता राजकारणी व प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कामावर खुश होत होते परंतु २००० च्या दशकापासून राजकारणात व प्रशासनात भ्रष्टाचारी लोकांचा शिरकाव झाल्यामुळे सर्व सामान्य जनतेचे राजकारणी व प्रशासकीय अधिकारी विश्वास उडत गेला आहे 2024 पासून या जिल्ह्यात महसूल पोलीस प्रशासनात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या नेमणूक झाल्यामुळे प्रशासनात
पारदर्शकता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे सध्या पोलीस उपमहा उपमहानिरीक्षक म्हणून शहाजी उमाप साहेब जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार पोलीस अधीक्षक गुरव पोलीस उपाधीक्षक अश्विनीताई जगताप यांच्यासह जिल्ह्यातील काही कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक त्यामध्ये ओमकार चिंचोलकर संतोष तांबे नागनाथ आईलाने यांच्यासह स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक आशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या नेमणूक झाल्यामुळे जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित असल्याचे दिसून येत आहे पोलीस प्रशासनात पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जिल्ह्यातील नामी गुंडांना जेरबंद करून हद्दपार केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील गुंडगिरी दादागिरी अवैध धंदेवाले यांच्यावर मोठी चाप बसली असल्यामुळे जिल्ह्यातील गुंडागर्दी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनीही जिल्ह्यात अनेक कठोर निर्णय घेऊन जिल्ह्यातील अवैध रेतीवाहतूक व इतर विविध धंदे गौण खनिज बंद केले असल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय बुरखे पांघरून अवैध धंदे करणाऱ्याचे धावेदनानले आहेत जिल्हाधिकारी यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर निवासी उपजिल्हाधिकारी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी यांची एक चांगली टीम तयार झाल्यामुळे जिल्ह्यात महसूल शासनाबद्दल चांगली भावना तयार झाली आहे सध्या जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासकीय अधिकारी परिस्थितीचा आढावा घेऊन आपला अहवाल सादर करीत आहेत तरीपण राजकारणी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे बळीराजा शासनाच्या मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे पालक मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा तात्काळ आढावा घेऊन पर्जन्यमय बाबीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे
stay connected