शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे.. एका गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही.. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटील यांची ग्वाही...

 शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे..
एका गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही..
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण पाटील यांची ग्वाही...

****************************

आ.सुरेश धस यांनी मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथा..

*******************************




*******************************

आष्टी (प्रतिनिधी) 

अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेच आहे..परंतु शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे..शेतकऱ्यांच्या व्यथांची जाणीव आहे..मतदारसंघातील एकही गुंठ्याचा नुकसानीबाबत पंचनामा राहणार नाही..याची आमदार सुरेश धस यांचे साक्षीने ग्वाही देतो ..असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री डाॅ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले ..

आष्टी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेल्या जलसंपदा मंत्री ना राधाकृष्णजी विखे पाटील यांनी अहिल्यानगर  आणि बीड जिल्ह्यातील गेल्या आठ दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या नुकसानीची पाहणी  करण्यासाठी आले..असता त्यांनी आमदार सुरेश धस यांच्या समवेत या सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. 

 आष्टी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 

पिकांचे,घरांचे,गावचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, खडकत येथील सीना नदीला पूर आल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या  व्यथा मंत्री विखे पाटील यांचे समोर आणल्या यावेळी ना.विखे पाटील म्हणाले, "मी तुमच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठीच इथे आलो आहे.मी एक-दोन ठिकाणी जात असलो तरी त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील यंत्रणा कामाला लागेल. सरकारी यंत्रणेकडून कोणी चुकलं असेल तर आता ते कामाला लागेल.तुमचा रोष असणं साहजिक आहे, कारण ज्याचं जळतं त्याला कळतं.तुम्ही व्यथा मांडत आहात,आणि तुमची चिंता योग्य आहे.मात्र, तुमच्या तालुक्यातील आणि गावातील एकाही गुंठ्याचा पंचनामा राहणार नाही, याची मी हमी देत असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करत सांगितले की,

आष्टी व कर्जत जामखेड तालुक्याच्या हद्दीत असलेल्या मौजे खडकत येथे कोल्हापूर पद्धतीच्या बांधऱ्याचा भराव फूटून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेत माहिती दिली.आष्टी मतदार संघातील जलसंपदा विभागाचे धिर्डी, निमगाव चो.,हिंगणी, टाकळसिंग, सांगवी, आष्टी, खडकत को. प. बंधारा यांसह इतर साठवण तलाव, मध्यम प्रकल्प व कालव्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर माहिती दिली.आपल्या विभागाच्या माध्यमातून तातडीने दुरुस्ती करून रब्बी हंगामासाठी पाणी साठवण्याची विशेष आर्थिक तरतूद करण्याची विनंती केली.



"मेंढरं, गुरं वाहून गेली असतील किंवा ज्या घरांची पडझड झाली असेल त्यासाठी नुकसानभरपाई दिली जाईल.ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.महसूल आणि कृषी विभाग काम करत आहेत.त्यामुळे काळजी करु नका,तुम्हाला मदत मिळेल. नुकसान भरपाई देण्याचे काम सुरु आहे आणि कोणताही शेतकरी किंवा गावकरी मदती पासून वंचित राहणार नाही याची खबरदारी मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी असल्याचे आ.धस यांनी सांगितले.

    यावेळी गणेश शिंदे,माजी सभापती दत्ता जेवे, , भाजपा तालुकाध्यक्ष रमेश गावडे,शांतिलाल काटे,ललित जेवे,बाळासाहेब पवार,प्रदीप मोरे ,बाळासाहेब भोष्टे, संदीप खेडकर सरपंच ,विनोद खेडकर,प्रवीण झांभरे ,संजय पवार,संजय जेवे, ज्ञानेश्वर भोसले मेजर,निशांत जेवे,गणेश जेवे यांच्यासह या प्रसंगी जलसंपदा विभाग, बीडचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता खडकत, टाकळसिंग, हिंगणी, सांगवी, आष्टी येथील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.