पुरामध्ये दुकानातील चाळीस लाखाचे सामान वाहून गेल्याने स्वप्नांचा झाला चुराडा
कड्यातील शरद फाळके या युवकाचे अतोनात नुकसान
आष्टी : प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथील कडी नदीला सोमवारी आलेल्या महाप्रलयकारी पुराने पदवीचे शिक्षण घेऊन नोकरी न लागल्याने व्यवसायाकडे वळलेल्या शरद फाळके यांच्या आदिनाथ लाईट इंडस्ट्रीज या दुकानातील चाळीस लाखापेक्षा जास्त किमतीचे सामान वाहून गेल्याने स्वप्नांचा चुराडा झाला आहे .
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील युवक शरद फाळके यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्याने वडिलांनी शेतीमध्ये काबाडकष्ट करून साठवून ठेवलेली पुंजी व बँकांचे कर्ज घेऊन कडा येथे आदिनाथ लाईट इंडस्ट्रीज हा व्यवसाय सुरू केला होता. या दुकानांमध्ये घरातील लाईट फिटिंगचे सर्व साहित्य होलसेल दराने मिळत होते. त्यामध्ये फॅन झुंबर बल्प लाईट फिटिंग पाईप बटन बोर्ड वायर विजेचे फोकस आधी मटेरियल मोठ्या प्रमाणात होते. सोमवारी सकाळी कडी नदीला महाप्रलयकारी पूर आल्याने हे पुराचे पाणी दुकानात घुसले आणि पाहता पाहता संपूर्ण दुकान या पुराचा बळी ठरले. तब्बल 12 तासानंतर पूर ओसरल्यानंतर दुकान उघडले असता दुकानांमध्ये सर्व साहित्य वाहून गेल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले. नवीनच व्यवसायात उतरलेल्या युवकाच्या स्वप्नांचा पुराच्या पाण्यात चुरडा झाला आहे.
stay connected