धानोरा शिवारात जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे
आष्टी तालुक्यातील मौजे धानोरा शिवारात दिनांक १५/०९/२०२५ रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन यात नागेश अशोक होळकर यांचे गट नं १४२/२/अ मध्ये महावितरण कडून अनुदान प्राप्त सोलर बसवण्यात आले होते, ओसवाल पंपस लिमिटेड कंपनीचा सोलर संच 3 हॉर्स पॉवरचा असुन त्याचा नोंदणी क्रमांक :- MS230122911 असा आहे .
त्याचे या जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टी मध्ये जमिनीवर बसवण्यात आलेला सर्व संच सोलर प्लेट सह पाण्यात वाहून गेला असून सर्व सोलर प्लेट फुटलेल्या अवस्थेत असून नुकसान झाले आहे. तसेच स्टाटर पाण्यात बुडालेला आहे. अडीच एकर पैकी दिड एकरातील कांदे , उडीद , सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले , शेतातील माती वाहून गेली तसेच कांदा चाळीतही पाणी शिरल्याने कांदयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे . सदरील शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली आहे .
stay connected