आ.सुरेश धस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिला बांधावर जाऊन दिलासा.
***************************
**************************
आष्टी (प्रतिनिधी)
रविवारी सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे आष्टी तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी नागरिकांना तडाखा दिला असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून आमदार सुरेश धस यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांना धीर देत अश्रू पुसण्यासाठी प्राधान्य दिले आहे. विविध ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन तात्काळ पंचनामे आणि नुकसान भरपाई देण्यासाठी कारवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आज सकाळपासून आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील धनगरवाडी,कापशी, पांगरा,खडकवाडी,वनवेवाडी,पाटसरा,सुरुडी,धामणगाव,दादेगाव,घाटपिंपरी,देवळाली,खलाटवाडी,डोंगरगांव यासह आदी ठिकाणी शेतकऱ्यांच्या दोन दिवसातील अतिवृष्टीने नुकसान झाले आहे त्या ठिकाणी चिखल असल्यामुळे जमिनीवर चालता येत नसल्यामुळे त्यांनी ट्रॅक्टरच्या हेळक्यावर बसून या भागातील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
यामध्ये परिसरातील तुडुंब भरून वाहिलेल्या विहिरी,तसेच कांदा,बाजरी, सोयाबीन, राजमा,आदी पिकांचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसानीची माहिती घेऊन तात्काळ सोबत असलेले कृषी अधिकारी गोरख तरटे यांना जलदगतीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
त्याच बरोबर..सुरुडी परिसरातील दोन गावतलाव फुटल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून परिसरातील शेतीतील सुपीक माती वाहून गेले असून त्या ठिकाणी केवळ दगड गोटे राहिलेले आहेत तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी देखील पूर्णपणे बुजून गेल्या आहेत या दोन्ही तलाव दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे याबाबत पाटबंधारे विभागाला सूचना केल्या त्याचबरोबर या भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे.ते तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
खडकवाडी परिसरातील नुकसान झालेल्या कांदा व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून सर्व पिके पूर्णपणे पाण्यात गेली असल्याचे विदारक चित्र आहे.
तसेच पेठ पांगरा येथील तलाव फुटून परिसरातील शेतकऱ्यांचे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे तेथील शेतकरी आक्रोश करत असताना आमदार सुरेश धस यांनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले.तसेच डाग वस्ती जवळून वाहणाऱ्या पांगरा ते कुत्तरवाडी नदीला पूर आल्याने तूर,कांदा या पिकांच मोठे नुकसान तर झालेच शिवाय तर नदीकाठच्या वसंत मिसाळ व पोपट मिसाळ या दोन भावांची राहती घरे पुराच्या पाण्यात वाहून गेली.
अतिशय जोरदार झालेले अपर्जन्यवृष्टीमुळे
आष्टी ते महिंदा रस्त्यावर असलेल्या सुरुडी नागतळा गावाला जोडणारा पूल पुराच्या पाण्याने पूर्णपणे खचला असून या पुलाची पाहणी करून उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या . अचानक आलेल्या या पुराच्या लोटामुळे धामणगाव येथील युवक अफरोज बशीर बागवान पाण्यात वाहून गेल्याने दुःखद निधन झाले त्या कुटुंबीयांचे सांत्वनभेट घेऊन धीर दिला.तसेच धामणगाव शहरातून जाणाऱ्या कडी नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या राहत्या घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ज्यामध्ये कुंडलिक कुदळे, मालन ससाणे,रघुनाथ पवार,राहुल पवार, अमोल पवार,कैलास पवार,विलास पवार, जयसिंग पवार,अनिता साळवे,हौसराव शिंदे,प्रमोद शिंदे,भाऊसाहेब शिंदे,दीपक शिंदे,भागवत शिंदे,आशाबाई साबळे यांना प्रत्यक्ष भेटून दिलासा दिला आणि नुकसान भरपाई बाबत आश्वासन दिले.घाटा (पिंपरी,)या गावात पुराच्या पाण्यामुळे जवळपास 11 हून अधिक घरातील उडीद,गहू,ज्वारी,या धान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. संसारोपयोगी वस्तूंचे देखील नुकसान झाले तर साठा केलेल्या कांदासह कांदाचाळी या पुरात वाहून गेल्या. तात्काळ यावर प्रशासनाला सूचना देऊन पुरात घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना बुधवारी धान्याचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.तसेच खंडित विद्युत प्रवाहाचे कामे जलदगतीने करून तो पूर्ववत करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत
देवळाली येथील वाहून गेलेल्या फळबागा, कांदाचाळी,छोटे छोटे पूल,घरांचे झालेले नुकसान याची पाहणी केली.दादेगाव व डोंगरगण येथे आलेल्या पुरामुळे झालेल्या व्यापक नुकसानीचा सविस्तर आढावा आ.धस यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन घेतला.नुकसानभरपाईची कार्यवाही होण्यासाठी संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले.
stay connected