अमोलक संस्थेत मोफत नेत्र विकार निदान शिबिर

 *अमोलक संस्थेत  मोफत नेत्र विकार निदान शिबिर* 



कडा (प्रतिनिधी): मुख्यमंत्री सहायता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व धर्मादाय उपायुक्त कार्यालय बीड आणि श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने  01 आक्टोबर 2025 रोजी नमो नेत्र संजीवनी आरोग्य अभियानांतर्गत मोफत नेत्र विकार निदान, उपचार व शस्त्रक्रिया  शिबिराचे आयोजन संस्थेच्या गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी  आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुरेशरावजी धस तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून धर्मदाय सह आयुक्त लातूर श्री राजेश सासणे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे धर्मादाय उपायुक्त बीड श्री प्रदीप चौधरी साहेब तसेच धर्मादाय वकील संघ अध्यक्ष उदयसिंह सालपे वकील साहेब तसेच या कार्यक्रमासाठी .  श्रीआनंद छाजेड प्रशासकीय अधिकारी आनंद ऋषीजी नेत्रालय व मेडिकल ऑफिसर डॉ. रितेश वाकडे व डॉ. सिद्धेश पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी या नेत्र विकार तपासणीसाठी आष्टी कडा व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा. . असे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.