माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे १ लाख ११,१११ रुपयाचा धनादेश सुपूर्द!

-

माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे १ लाख ११,१११ रुपयाचा धनादेश सुपूर्द!


-----------------------

संवेदनशील मनाच्या धोंडेंना  संकटग्रस्त बळीराजांचे आशीर्वाद...

---------------------



--------------------

आष्टी (प्रतिनिधी)

गेल्या आठवड्यापासून अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजुरांचे जीवन पूर्णतः संपुष्टात आले आहे.अत्यंत भयावह परिस्थितीमध्ये सापडलेल्या बळीराजाला प्रशासन मदन करेलच... तत्पूर्वी माजी आमदार असलेल्या आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून समजल्या जाणाऱ्या आष्टी,पाटोदा,शिरूर का.चे माजी आ.भीमराव धोंडे यांच्यावतीने आज थेट बीड जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन १ लाख ११ हजार १११ रुपयाचा धनादेश सुपूर्त करून माणुसकीचा एक पैलू यानिमित्ताने कर्तव्य करत निभावला आहे.दरम्यान,ही बाब सर्वसामान्य शेतकरी शेतमजुरांच्या लक्षात येताच लोकप्रतिनिधी असावा तर असा... अशा भावना सर्वसामान्य ग्रामीण भागातील शेतकरी बांधवातून व्यक्त केल्या जात आहेत.बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे

१ लाख ११ हजार १११ रु.चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देताना माजी आ. भीमराव धोंडे,पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल जायभाये,समता परिषदेचे तालुकाध्यक्ष दिगंबर नाईकनवरे,पत्रकार हमीद पठाण,माजी सरपंच भागवत वारे,माजी सरपंच प्रफुल्ल सानप आदि मान्यवर उपस्थित होते.




--------


सर्वजण मिळून शेतकऱ्यांना 
या संकटातून बाहेर काढू..


-------------------------


 आपण केलेली ही मदत फार मोठे कार्य नसून माझे ते कर्तव्य आहे असे मी समजतो.शासन, प्रशासन,लोकप्रतिनिधी आजी- माजी आमदार, खासदार यांच्यासह ज्यांच्याकडे उपलब्धता आहे अशा सर्व घटकांनी जमेल तशी आर्थिक मदत करून ग्रामीण भागातील बांधवांना आपण या संकटातून बाहेर काढू,अशा कर्तव्यशील भावना माजी आ.भीमराव धोंडे यांनी या धनादेश सुपूर्द केल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.

------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.