यावर्षीचा श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड दसरा मेळावा स्थगित -- आ.सुरेश धस

 यावर्षीचा श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गड दसरा मेळावा स्थगित 
-- आ.सुरेश धस 



आष्टी ( प्रतिनिधी )

 गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पूरपरिस्थिती आणि शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान पाहता यंदाचा श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव येथील दसरा मेळावा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून

 केवळ पारंपरिक पूजन आणि गडावर समाधी बांधकामाच्या शिलारोहन कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष आ.सुरेश धस यांनी दिली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की,मराठवाड्यात अतिवृष्टीने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. यामध्ये आष्टी विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पुरात अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टर व बोटींच्या साह्याने स्थलांतरित करण्याची वेळ यावेळी ओढवली आहे.ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत दीडपट जास्तीचा पाऊस झाल्यामुळे जोमात आलेले खरीप हंगामातील पीक आडवे झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून वाहून गेलेले आहेत.सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पिकांचा चिखल केला.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना ज्या माध्यमातून मदत करता येईल त्याप्रमाणे सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदा मच्छिंद्रनाथ गड सावरगाव येथे सालाबाद प्रमाणे होणारा दसरा मेळावा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेला असून विजयादशमीच्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता गडावर सुरू असलेल्या श्री मच्छिंद्रनाथांच्या समाधीच्या बांधकामाचा शिलारोहण कार्यक्रम करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष आ.सुरेश धस यांनी दिली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.