अमोलक संस्थेत संस्थापक प. पू अमोलकऋषीजी म. सा. यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे व विविध स्पर्धांचेआयोजन

 *अमोलक संस्थेत संस्थापक प. पू अमोलकऋषीजी म. सा. यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे व विविध स्पर्धांचे आयोजन*



कडा (प्रतिनिधी): येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ आणि संस्थेच्या सर्व विद्याशाखांच्या वतीने संस्थेचे संस्थापक शास्त्रोध्दारक जैनाचार्य प. पू. श्री अमोलक ऋषीजी म. सा. यांच्या 89 व्या पुण्यतिथी निमित्त 13 सप्टेंबर रोजी     भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ कडा या शतक पूर्ती करणाऱ्या संस्थेचे संस्थापक प. पू. श्री अमोलक ऋषीजी म. सा. यांच्या 89 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १३ सप्टेंबर रोजी त्यांच्या प्रतिमेची कडा शहरामधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच याप्रसंगी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. पुण्यतिथी सोहळ्या नंतर सर्व उपस्थितांना व सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष श्री. गोकुळदासजी मेहेर यांच्या कडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

अमोलक  संस्था सतत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित असते. त्याचाच एक भाग म्हणून या पुण्यतिथी सोहळ्या निमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. याचा सर्व रक्तदात्यांनी लाभ घ्यावा व या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे. 



कोरोणाच्या काळात ज्या अनेक समस्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना भेडसावल्या त्यामध्ये रक्त उपलब्ध करण्याची समस्या प्रमुख होती. रक्तदानामुळे  अनेकांना जीवदान मिळते. अनेक मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये किंवा गंभीर परिस्थितीमध्ये रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते व रक्तामुळे त्यांचे प्राण वाचू शकतात. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. 

रक्तदानाने फक्त दुसऱ्याचा फायदा होतो असे नाही तर नियमित रक्तदानाने शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह सुरळीत चालू राहतो आणि हृदयविकाराचा धोका ३० ते ४० टक्क्यांनी कमी होतो. रक्तदान हे जीव वाचवण्याची कृती आहे. त्यामुळे १८ ते ६५ वर्ष वयोगटातील जास्तीत जास्त निरोगी व्यक्तींनी यावेळी रक्तदान करावे असे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.