एकलव्य संघटनेच्या वतीने आष्टी तहसील कार्यालयवर धडक मोर्चाचे आयोजन

 

एकलव्य संघटनेच्या वतीने आष्टी तहसील कार्यालयवर धडक मोर्चाचे आयोजन





आष्टी प्रतिनिधी - दिनांक १९/०९/२०२५ रोजी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांचे वतीने विविध प्रकारच्या मागणी साठी आष्टी तहसील कार्यालायवर धडक मोर्चा चे आयोजन बीड जिल्हा व आष्टी तालुका कमिटी यांचे वतीने करण्यात आले आहे तरी प्रशासनाने खालील मागणीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी
सदर मोर्चा हा शासकिय विश्राम गृह येथून निघणार आहे तरी मोर्चाचा मार्ग (शासकिय विश्राम गृह, शिवाजी चौक, डॉ, बाबासाहेब आंबेडकर चौक, ते तहसील कार्यालय आष्टी) असा मार्ग आहे. या मोर्चात पुढील मागण्या असतील



१)आदिवासी जमाती मध्ये कुठल्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये,
२) राज्यात आदिवासी बजेट कायदा लागू करण्यात यावा,
३) वन व गायरान जमिनीवर असणारे अतिक्रमण कायम करावेत.
४) आदिवासी जमिनीवर बे कायदेशीर बिगर आदिवासी चे अतिक्रमण काढून आदिवासी यांना जमिन मोकळ्या करुन देण्यात याव्यात.
५) मासेमारीचे ठेके हे आदिवासी यांनाच देण्यात यावेत.
६) अनुसूचित जाती जमाती कायद्याची अंमलबजावणी कडक करण्यात यावी.
७) छत्रपती संभाजीनगर येथील अदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांचे अंतर्गत १ उपकार्यालय बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात करण्यात यावे.
८) शासन निर्णय न्युबयो-२०२५/प्र.क्र.६३/का-०९ दि.०७ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयाप्रमाणे सक्षमीकरण योजना युद्ध पातळीवर राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी कारवाई करण्यात यावी.
९) प्रत्येक मतदार यादीमध्ये, कुपन, जातीचे दाखले व आधार कार्ड नोंदणीसाठी अदिवासींचे नावे समाविष्ठ करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात यावेत. या मागण्यांसंदर्भात तहसिलदार आष्टी यांना निवेदन देण्यात आले . यावेळी रावसाहेब पिंपळे जिल्हाध्यक्ष, राजु माळी अदिवासी एकता परिषद, शंकर बर्डे, आष्टी तालुकाध्यक्ष , दिलीप बर्डे, जिल्हा सचिव , देवराम पिंपळे, सामाजीक कार्यकर्ता ,राजु मोरे, शिवाजी माळी , राजू गायकवाड ( मसोबा वाडी ) हौसराव पिंपळे , भास्कर पिंपळे , यमाजी गायकवाड , गोकूळ पिंपळे , रावसाहेब पवार , बाबासाहेब माळी , गणेश बर्डे , मच्छिंद्र बर्डे , कैलास गायकवाड , अनिल माळी , कैलास माळी , सुभाष माळी , संपत मोरे , सुनिता पिंपळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.