शनिवारी वाघळूज येथे आष्टी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन

 शनिवारी वाघळूज येथे आष्टी तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन




आष्टी प्रतिनिधी -शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रीडा व युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत बीड क्रीडा परिषद तथा क्रीडा कार्यालय बीड तसेच गटशिक्षण अधिकारी कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने आष्टी तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सन 2025 - 26 साठी 17 वर्ष वयोगटातील मुले यांची स्पर्धा शनिवार दि १३ सप्टेबर रोजी वाघळूज येथे संपन्न होणार आहे .या स्पर्धेचे उद्घाटक ॲड . हनुमंतराव थोरवे ( सचिव लोकमान्य शिक्षण संस्था खुंटेफळ ) यांच्या हस्ते उद्घाटन होईल श्री संत कैकाडी महाराज विद्यालय वाघळूज तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होणार आहेत . तसेच परिसरातील सर्व क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमींनी या भव्य तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उपस्थित राहून स्पर्धेची शोभा वाढवावी व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे तसेच  त्यानंतर लोकमान्य शिक्षण संस्था खुंटेफळ यांच्या वतिने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दि १३ रोजी सायं ५ वा संपन्न होणार आहे . तरी बक्षीस वितरण लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील हनुमंतराव थोरवे   व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होईल .तरी या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे . असे आवाहन आयोजक श्री संत कैकाडी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघळूज यांनी केले आहे .






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.