अ. भा. मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार देणार

 *अ. भा. मराठी पत्रकार परिषद यावर्षी पासून समाजसेवेसाठी पुरस्कार  देणार*





मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने पत्रकारितेत देदीप्यमान कामगिरी करणारया पत्रकारांना विविध पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित केले जाते.. यावर्षी पासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया व्यक्तींना "लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक -शैक्षणिक सेवा गौरव" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.. 51,111 रूपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल..  रामशेठ ठाकूर यांनी परिषदेकडे ठेवलेल्या ठेवीतून हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे ..फेब्रुवारी 2026 मध्ये यंदाचे पुरस्कार दिले जातील.. 

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडे विविध मान्यवरांनी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी 10 पत्रकारांचा गौरव केला जातो.. यामध्ये परिषद स्वतःच्या निधीतून एका ज्येष्ठ पत्रकाराचा "आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार" देऊन गौरव करीत असते.. 25 हजार रुपये रोख, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असते.. 

यावर्षी पासून सामाजिक आणि शेक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारया एका मान्यवर व्यक्तीचा "लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक सेवा गौरव पुरस्कार" देऊन सन्मान केला जाणार आहे.. एक निवड समिती पुरस्कार्थींची निवड करते.. 

पत्रकारितेच्या क्षेत्रात परिषदेचे पुरस्कार मानाचे समजले जातात.. यापुढे एका समाजसेवकाचा सन्मान परिषदेच्या या पुरस्कारांची उंची वाढवणार आहे..

एस.एम.देशमुख, मिलिंद अष्टीवकर आणि पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी नुकतीच पनवेल येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली..






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.