*खालापूरीत दारू धंद्याना अभय कोणाचे? तक्रार करूनही सरपंच ग्रामसेवक, तलाठी आणि शिरूर पोलीस स्टेशनंच्या नाकावर टीच्चून ग्रामपंचायत गाळ्यात सर्रास दारूविक्री.*
बीड प्रतिनिधी:- खालापूर हे गाव पोलिसांचे गाव म्हणून उदयास येत असतानाच या गावांमध्ये पोलीस प्रशासनातील बरेच अधिकारी आहेत असं असताना देखील या ठिकाणी सर्रासपणे ग्रामपंचायत गाळ्यामध्ये व ग्रामपंचायत जागेवर दारू विक्री होत आहे खालापुरी गावातील सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी आणि शिरूर पोलीस स्टेशन यांच्या नाकावर टिचून तक्रार करून देखील या ठिकाणची दारूबंदी होत नाही दारू विक्रेत्यांना असं कोणाचं अभय आहे की ज्यांच्या शुभ आशीर्वादामुळे आज पर्यंत खालापुरी येथील दारू विक्री बंद होत नाही खालापुरी येथील नव तरुणांना व्यवसायासाठी खालापुरी ग्रामपंचायत गाळे उपलब्ध करून देत नाही परंतु खालापुरी येथे दारू विकण्यासाठी ग्रामपंचायतचे गाळे सर्रासपणे दिले जातात पोलीस प्रशासनाकडे तक्रार करूनही ही दारूबंदी होत नसल्याकारणाने खालापुरी येथील गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत एकीकडे खालापुरी गावातील नवयुवक पोलीस प्रशासनामध्ये भरती होण्यासाठी दिनरात मेहनत करत आहेत अतिवृष्टी मध्ये मुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पीक पिकत नाहीये शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा उरलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये येथील काही शेतकरी अवैध धंद्यामुळे गावातच दारू उपलब्ध झाल्या कारणाने दारुडे होताना दिसत आहेत परिणामी जो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी लागला पाहिजे संसारामध्ये लागला पाहिजे तो पैसा दारूमध्ये उडवला जात आहे खालापूर येथील दारूबंदीसाठी येथील बऱ्याच लोकांनी अर्ज विनंती तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये ग्रामसेवक तलाठी आणि सरपंच यांच्याकडे करून देखील खालापूर येथील दारूबंदी होत नाही खालापुरी पंचक्रोशी मध्ये अवैध धंद्यांसाठी खालापुरी हा अड्डा झालेला असून येथे पत्त्यांचे क्लब दारू तस्तम नशेरी पदार्थ विकण्याचे माहेरघर कालापुरी झालेली आहे परंतु येथील राजकर्त्यांचेच बगलबच्चे सर्रासपणे नशेरी पदार्थ विकताना दिसत आहेत वेळोवेळी याचा पाठपुरावा करून देखील कालापुरी येथील दारूबंदी होत नाहीये उलट सर्रासपणे मंदिरासमोर व बोर्डाच्या जागेवर ही दारू विक्री होत आहे तरी खालापूर येथील सरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी शिरूर तालुक्यातील तहसीलदार शिरूर पोलीस स्टेशन यांनी तात्काळ खालापूर येथे बैठक घेऊन कालापुरी येथील अवैध धंद्यांना बंद केले पाहिजे याचा धंदा बंद कर त्याचा धंदा बंद कर असं करण्यापेक्षा सर्रासपणे कालापुरी येथील दारूबंदी झालीच पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितिन दादा वंजारी खालापुरी कर यांनी केले आहे पोलीस प्रशासनाला तक्रार करूनही पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून ही दारू विक्री होत आहे गावातील अनेक संसार मोडकळीस आले आहेत दारूमुळे घराघरांमध्ये आग लागलेली असून कर्जबाजारीपणाला कंटाळून लोकांच्या आत्महत्या होत आहेत व अपघातामुळे जीवन मरणाचा प्रश्न उद्भवत आहे त्यातच अतिवृष्टी ओला दुष्काळ आणि शेतातील पीक वाया गेल्यामुळे वाट्याला आलेले नैराश्य आणि यातून व्यसनाधीनता वाढून यापुढेही अनेक आत्महत्या होतील असा अंदाज आहे तरी गावातील प्रशासन शासन अधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून खालापुरी येथे तात्काळ बैठक टाकून व्यसनमुक्ती दारूबंदी पत्त्याचे क्लब बंदी अशा पद्धतीचे कार्यक्रम घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन समितीतर्फे वायफल्यग्रस्त कुटुंबांसाठी व्यसनमुक्ती आणि आत्महत्या रोखण्यासाठी वैद्यकीय व माणूस उपचार सल्ल्याचे शिबिर खालापूर येथे आयोजन करण्याचे आवाहन शिरूर येथील तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशन शिरूर कासार यांना प्रसिद्धीपत्रकामार्फत डॉक्टर जितेंद्र दादा वंजारी खालापुरीकर यांनी निवेदन केले आहे तरी प्रशासनाने तात्काळ खालापुरी येथील दारूबंदी करून येथील गोरगरीब जनतेस न्याय द्यावा असे डॉक्टर वंजारे यांनी म्हटले आहे.
stay connected