आष्टी येथे नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाचे आ.सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन
****************
गरजू रुग्णांची होणार.. मोफत नेत्र तपासणी
*********************
********************
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी येथे नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, धर्मादाय उप आयुक्त कार्यालय बीड आणि श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान, आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र विकार निदान, उपचार आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आष्टी विधानसभेचे आ.सुरेश धस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.हे शिबिर बुधवार, दि. ०१/१०/२०२५ सकाळी १० वाजता अनिषा ग्लोबल इंग्लिश स्कूल, जामगाव रोड, आष्टी येथे होणार आहे..
या शिबिराचा शुभारंभ लातूर येथील सह धर्मादाय आयुक्त राजेशजी सासणे यांचे हस्ते आणि बीड येथील धर्मादाय उपआयुक्त श्री.प्रदीपजी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून..
या शिबीरात डोळ्यांचे प्राथमिक विकार तपासणी, चष्म्याचा नंबर तपासणी तसेच मोतीबिंदू तपासणी केली जाईल. शस्त्रक्रियेसाठी उपस्थित राहणाऱ्यांनी आधार कार्ड किंवा ओळखपत्र, रेशनकार्ड तसेच जुन्या तपासणीचे रिपोर्ट (असल्यास) बरोबर आणणे आवश्यक आहे. तपासणीसाठी उपस्थित राहावयास इच्छुक व्यक्तींनी डोळ्यांची जळजळ, सूज व सतत पाणी येणे, धूसर अथवा अस्वस्थ दृष्टी, हळूहळू अथवा अचानक दृष्टी कमी होणे, सतत डोकेदुखी व प्रकाश भोवती वर्तुळे दिसणे तसेच डोळ्यावर मास किंवा पडदा येणे यासारख्या लक्षणांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे..
शिबीराची वैशिष्ट्ये अशी आहेत की तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी होईल, मोफत चष्मे वाटप केले जाईल, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईल आणि नेत्र तपासणी आनंदऋषिजी नेत्रालय, अहिल्यानगर यांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार असल्यामुळे सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे..
stay connected