अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी कांदा चाळी आणि नष्ट झालेल्या फळबागा नुकसानी बाबत आ.सुरेश धस यांची मंत्री भरत गोगावले यांच्याकडे उपाययोजना करण्याची मागणी..

 अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी कांदा चाळी आणि नष्ट झालेल्या फळबागा नुकसानी बाबत आ.सुरेश धस यांची मंत्री भरत गोगावले यांच्याकडे उपाययोजना करण्याची मागणी..





आष्टी (प्रतिनिधी )


आष्टी विधानसभा मतदारसंघातील आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले असून रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या सिंचन विहिरी बोजल्या गेल्या वाहून गेल्या असून कांदा चाळ यांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे त्याचबरोबर फळबागादेखील नष्ट झाल्या आहेत या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत उपाययोजना करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांचेकडे केली आहे आज मंत्रालयामध्ये प्रत्यक्ष मंत्री महोदयांची भेट घेऊन त्यांनी या मागणीबाबत निवेदन दिले असता मंत्री महोदयांनी सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले आहे.

    या भेटीत आष्टी,पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यातील अनेक गावातील अतिवृष्टीमुळे बुजलेल्या आणि वाहून गेलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीबाबत चर्चा केली. दि. 14, 15 आणि 16 ऑगस्ट 2025 या तीन दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आष्टी तालुक्यातील मेहकरी, सीना, कांबळी, कडी, बोकडी आणि शिरूर (कासार) तालुक्यातील सिंदफणा, किना, कापरी या नदी पात्रातील उच्च दाबामुळे नदीपात्रा लगतच्या शेतजमिनीमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरी बुजल्या किंवा वाहून गेल्या. विद्यमान शासन निर्णयानुसार 1.5 लक्ष रुपयांची रक्कम मंजूर होती, परंतु नुकसान भरून काढण्यासाठी ही रक्कम 3 लक्ष रुपये करण्यात यावी, अशी  विनंती मंत्रीमहोदयांना केली.तसेच , महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कांदाचाळ बांधकामासंबंधीही चर्चा झाली. शासन निर्णयानुसार दि. 18/5/2023 रोजी वैयक्तिक कांदाचाळ बांधकामास मंजुरी देण्यात आली होती; परंतु दि. 9/7/2024 च्या शासन शुद्धीपत्रकानुसार सामूहिक कांदाचाळ बांधकाम करणे आवश्यक असल्याचे निर्देश आले. अनेक गावांमध्ये सामूहिक बांधकाम करण्यास अडचणी असल्यामुळे, वैयक्तिक कांदाचाळ बांधकामासही मंजुरी देण्याची आवश्यकता असल्याचे मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले.त्याचबरोबर आष्टी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये दि. 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नद्यांच्या महापुरामुळे संत्रा, डाळिंब, मोसंबी, केळी, लिंबू, द्राक्ष यासह अन्य फळझाडांच्या बागा नष्ट झाल्या. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याने राज्य फलोत्पादन विभागाच्या माध्यमातून दुबार लाभ देऊन आर्थिक दिलासा मिळावा, अशी विनंती केली. तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या सार्वजनिक रस्ते, शाळा कंपाउंड यांसारख्या कामांची सद्यस्थिती तपासणी करून  आवश्यक सुधारणा करण्यात यावी याबाबत मंत्रिमहोदयांनी या  उपाययोजनां करण्याबाबत तात्काळ  कार्यवाही होईल असे आश्वासन दिले आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.