गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप* *बाप्पा मोरयाच्या जयजयकाराने जामखडे शहर दणाणले* *आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले!* *आठ तासाच्या मिरवणूकीनंतर शांततेत विसर्जन*

 *गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप* 
 *बाप्पा मोरयाच्या जयजयकाराने जामखडे शहर दणाणले* 
*आकर्षक मिरवणुका, विद्युत रोषणाईने रस्ते उजळले!*
 *आठ तासाच्या मिरवणूकीनंतर शांततेत विसर्जन* 
  - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - 




जामखेड - गणेशोत्सव निमित्ताने मागील अकरा दिवस भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्ता  श्रीगणेशाचे ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकत्यांनी जल्लोषात विसर्जन केले. दरम्यान विसर्जन मिरवणकीत सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत नाचण्याचा आनंद लुटला. दोन मंडळ आमनेसामने आले होते पण त्यांच्यात किरकोळ बाचाबाची वगळता आठ तास मिरवणूक चालली. यानंतर शांततेत श्रीगणेशाचे विसर्जन नगरपरिषदेने केलेल्या कृत्रिम कुंड्यात व श्री नागेश्वर नदीवरील बंधा-यात करण्यात आले. जामखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. 


      जामखेड शहरात मोठे व लहान मंडळाचे ४४  ग्रामीण भागात एकूण ८० मंडळानी श्री गणेशाची स्थापना केली होती. सातव्या दिवसापासून शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती. आकराव्या दिवशी शहरातील १६ व ग्रामीण भागातील ३६ असे एकूण ५२ मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री १२.५ मिनिटांनी झाले. प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची भक्ती मय वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकत्यांनी गुलालाची उधळण केली.


    मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते. बालगणेश मंडळानी सकाळी चारचाकी, हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या. दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या

गर्दीने पुन्हा फुलून गेले, तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला. ढोल-ताशा लेझीम फड ढोलीबाजा-बेन्जोबाजा डी.जे.अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लोगल्लीतील, चौकाचौकातील गणपतींची ट्रॅक्टर, टेम्पो, मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली. गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने शहर व परिसर दणाणून गेले. या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने माखून निघाले. सार्वजनीक मंडळांनी टॅक्टरमध्ये गणेश मुर्तीच्या चोहोबाजूंनी  मंदिराच्या कलाकुसरींनी जामखेड शहर उजळून निघाले होते.  

छत्रपती शिवाजी महाराज पेठ पूर्णपणे गजबजून गेली होती. त्यामुळे हा सारा परिसरच जणू गणपतीमय झाला होता. भगव्या टोप्या, पट्ट्या, डोक्यावर मिरवणारे आणि गुलालाने माखलेले हजारो आबालवृद्ध वाद्यमेळाच्या तालावर बेभान होऊन नाचणारे तरुण दिसत होते. 


      दरवर्षी प्रमाणे गेली आकरा वर्षापासून नगरसेवक अमित चिंतामणी मित्र मंडळाच्या वतीने गणेश भक्तांचे स्वागत कक्ष उभारून सर्व गणेश मंडळ यांचे सत्कार करतात .

यावर्षी आदर्श फाऊंडेशनचे आकाश बाफना व माजी नगरध्याक्ष विकास राळेभात यांच्या वतीने शहरातील गणेश भक्तांचे स्वागत कक्ष उभारून स्वागत करण्यात येत होते.

     गणेश मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा सत्कार प्रा. मधुकर राळेभात ,सभापती शरद कार्ले, माजी सभापती भगवान मुरूमकर, अमित चिंतामणी , पवन राळेभात, विकास राळेभात , संपत राळेभात, राहुल उगले, प्रदीप टापरे , महेश निमोणकर , मनोज कुलकर्णी ,अमोल गिरमे, गणेश डोंगरे, तात्याराम पोकळे , गणेश आजबे, आकाश बाफना. प्रविण सानप , कांतीलाल वराट , राहुल बेदमुथ्या यांच्या हस्ते सर्व गणेश मंडळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .   

      गणरायाचे विसर्जन पाहण्यासाठी जामखेडकरांची मेनरोडवर गर्दीची लाट उसळली होती.

        कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


                  

 *संघर्ष मित्र मंडळाचे भक्तीमय वातावरणा गणेश विसर्जन*


जामखेड येथील कोर्ट रोडवरील संघर्ष मित्र मंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुक दरवर्षी प्रमाणे टाळ मृदुंगाच्या भजन किर्तन करून भक्तीमय वातावरणात वसर्जन मिरवणुक आगदी शांततेत पार पाडून गणेशाचे विसर्जन केले . हे या विसर्जन मिरवणुकीचे अदर्श आकर्षन ठरले . ढोल - ताशा, डी . जे . यांना आळा घालुन  इतर मंडळांनी संघर्ष मित्र मंडळाची प्रेरणा घ्यावी अशी प्रतिक्रिया भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी व्यक्त केली .


                    

 *पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची धावती भेट* 
----------------------------------

अहिल्यानगर जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर साडेतीन महिन्यानंतर ते प्रथमच जामखेड शहरात शनिवारी श्री गणेश विसर्जन निमित्ताने आले. त्यांनी विसर्जन मिरवणूक मार्ग, बंदोबस्त नियोजन व विसर्जन स्थळ ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला यानंतर  सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकारी व शांतता कमिटी सदस्यांची एकत्रीत बैठक घेऊन धार्मिक सलोखा राखून श्री चे शांततेत विसर्जन करण्याचे आवाहन केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या.

  यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा सत्कार जामखेड पत्रकार संघांच्या वतीने करण्यात आला . यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण उपध्याक्ष अशोक निमोणकर, पत्रकार यासीन शेख, अवधुत पवार, विनायक राऊत उपस्थित होते .

 यावेळी पोलीस अधीक्षक रामनाथ घार्गे , नगरसेवक अमित चिंतामणी , आकाश बाफना, सभापती शरद कार्ले, पवन राळेभात , प्रदीप टापरे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या .



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.