आष्टीतील एवरेस्ट अबॕकस अकॕडमीची ४० वी.नॅशनल लेवल कॉम्पिटिशन एक वैशिष्ट्यपूर्ण-- डाॕ.अजयदादा धोंडे

 आष्टीतील एवरेस्ट अबॕकस अकॕडमीची ४० वी.नॅशनल लेवल कॉम्पिटिशन एक वैशिष्ट्यपूर्ण-- डाॕ.अजयदादा धोंडे 

-------------------



-------------------

आष्टी (प्रतिनिधी) 

आष्टीमध्ये पहिल्यांदाच होणारी पालकांच्या अग्रहाने ४० वी. नॅशनल लेवल कॉम्पिटिशन असून या स्पर्धेत  मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले आहेत.ही कॉम्पिटिशन एक वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. एवरेस्ट अबॅकस अकॅडमीमध्ये लाखो विद्यार्थी शिकत असून त्यातील ८० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. अकॅडमीमध्ये सर्व महिला शिक्षिका आहेत.गुणवत्ता व प्रामाणिकपणा यामुळे अकॅडमी अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांचा लाभ घ्यावा आष्टीतील ४० वी. नॅशनल लेवल कॉम्पिटिशन एक वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे प्रतिपादन डाॕ.अजयदादा धोंडे यांनी केले.

   आष्टी येथे ४० वी.नॅशनल लेवल कॉम्पिटिशनच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

      यावेळी आष्टीचे नायब तहसिलदार भगीरथ धारक, लिटिल एंजेल स्कूल घोगरगावचे प्रकाश बोरुडे, पं.स.चे मा.सदस्य दादासाहेब जगताप,आर्मी पब्लिक स्कूल ॲन्ड जुनियर कॉलेजचे संस्थाध्यक्ष संजय खराडे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार शरद रेडेकर,आदर्श शिक्षीका सौ.आशा रंगनाथ धोंडे - शिंदे, मा.पंचायत समिती उपसभापती सिध्देश्वर देशमुख,जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय उपाध्यक्ष सौ. सुवर्णाताई गि-हे,बावी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे पुंडलीक लटपटे,शिराळ येथील किलबिल त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे संस्थाध्यक्ष सुधीर करडुले,प्रा.दत्तात्रय करडुले, सिने बालकलाकार साईराज सरडे,सिने बालकलाकार अनुजा शिंदे,रामलिंग राजमाने आदी मान्यवर उपस्थित होते.

       यावेळी प्रस्ताविक डाॕ. कल्पना घडेकर यांनी करुन या अकॕडमीबाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी डाॕ. अजयदादा धोंडे म्हणाले की, १९८३ साली एव्हरेस्ट अबॕकस अकॕडमी या संस्थेची स्थापना झाली आहे. अकॅडेमीचा विस्तार१२३६ शाखेच्या माध्यमातून भारत व इतर १२ देशात आहे.अकॅडेमीतील एकूण शिक्षिका संख्या १२३६ असुन एकूण विद्यार्थी संख्या २४ हजार ६०० आहे.राष्ट्रीय स्तरावरील ३९ स्पर्धा झालेल्या आहेत असे धोंडे यांनी  सांगितले.यावेळी सौ. सुवर्णाताई गि-हे,सिध्देश्वर देशमुख,दादासाहेब जगताप, नायब तहसिलदार भगीरथ धारक यांचे भाषणे झाले. यावेळी सौ.सुवर्णाताई गि-हे म्हणाल्या की,एवरेस्ट अबॅकस अकॅडमीतील महिला शिक्षकांनी रक्षिता अभियान संस्थेची स्थापना केली आहे व या माध्यमातून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात.मुलगी शिकणे गरजेचे आहे त्यापेक्षा मुलगी सुरक्षित राहणे गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन शाळांमधून हे प्रशिक्षण दिले जाते.विद्यार्थिनींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे शास्त्रीय संकल्पनेवर आधारित परिपूर्ण बौद्धिक विकास कोर्सच्या माध्यमातून होत आहे असेही सांगितले.यावेळी मार्गदर्शन करताना डाॕ.सौ. कल्पना घडेकर म्हणाल्या की,या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मिळणारा वेळ - फक्त ५ मिनिट ५ मिनिटात आतापर्यंतचे मेरीट 

बेरीज वजाबाकी २०३,गुणाकार १९७,भागाकार १६२,वर्ग संख्या १२६ आहे.अबॅकस शिकण्याच्या फायद्यामुळे  गणितीय कौशल्यांचा विकास होऊन मुलांना संख्या आणि गणिताच्या तत्त्वज्ञानाचे ज्ञान होते.ज्यामुळे ते जलद आणि अचूक गणिताचे उदाहरणे सोडवू शकतात.अबॅकस शिकल्याने मुलांना मानसिक गणना करण्याची क्षमता विकसित होते.ज्यामुळे ते कमी वेळेत अधिक अचूकतेने गणित करू शकतात.स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते अबॅकस वापरताना मुलांना मणी हाताळण्याची आणि त्यांची गणना करण्याची सवय लागते. ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. आत्मविश्वास: अबॅकसमुळे मुलांमध्ये गणिताविषयी आत्मविश्वास वाढतो कारण ते गणिताचे प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवू शकतात.विश्लेषणात्मक आणि तर्कशक्ती:अबॅकसचा वापर केल्याने मुलांमध्ये विश्लेषणात्मक आणि तर्कशक्ती वाढते,ज्यामुळे ते समस्या सोप्या पद्धतीने सोडवू शकतात.कल्पनाशक्तीचा विकास होऊन अबॅकस मुलांना संख्या आणि गणिताची कल्पना करण्यास मदत करते.ज्यामुळे त्यांची व्हिज्युअलायझेशन (visualization) क्षमता वाढते.अबॅकसामुळे मुलांची गणितामधील भीती कमी होण्यास मदत होते कारण ते गणिताचे ज्ञान सोप्या पद्धतीने मिळवतात.अंकगणित आणि गणितीय संकल्पना: अबॅकस विद्यार्थ्यांना अंकगणित आणि गणितीय संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते.शिकण्याची प्रक्रिया सोपी होते:अबॅकस विद्यार्थ्यांना शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि मजेदार बनवतो. अबॅकसचा उपयोग कोणत्या परीक्षांमध्ये होतो.अबॅकसचा उपयोग विद्यार्थी देशातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी होतो.उदा. स्कॉलरशिप,ऑलंपियाड,

मंथन,प्रज्ञाशोध यांसारख्या परीक्षा ११ वी,१२ वी. Maths, Physics या विषयांमध्ये

बारावीनंतरच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांसाठी सर्वाधिक उपयोग होतो. MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षा ज्या परीक्षेत गणित विषयाचे पर्यायी 

( OBJECTIVE) प्रश्न असतात त्या सर्वच परीक्षांसाठी अबॅकसचा उपयोग होतो असे डाॕ.सौ.कल्पना घडेकर म्हणाल्या.यावेळी एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमी बेस्ट टीचर अवार्ड सौ.पूनम धोंडे,सौ. प्रियंका शिंदे,मास्टर ऑफ अबॅकस पदवी संग्राम सुभाष बेरड, अपर्णा विनायक धामणे,नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन चॅम्पियन विद्यार्थी

संग्राम भोगाडे,विश्वास नागवडे,

रुद्र बोडखे,श्रेया पवार,सोहम बडे, माहेश्वरी शेवाळे,ओवी नजन,पंकज ढाकणे,युवराज ढवळे,जानवी नागरे,जयेश निंबाळकर,उदय आंधळे,आर्या एकशिंगे,संग्राम बेरड यांचा समावेश आहे.या कार्यक्रमाचे बहारदार संचलन अमोल बागुल यांनी तर उपस्थितीतांचे आभार आण्णासाहेब शिंदे यांनी मानले.



---------


एव्हरेस्ट अबॅकस अकॅडमीच्या मार्गदर्शिका व रक्षिता महिला मंचच्या संस्थापिका डॉ.सौ. कल्पना अशोक घडेकर- कार्ले यांचा यावेळी मान्यवरांचे हस्ते  सत्कार करण्यात आला. सरकारच्या नीती आयोग, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय तसेच सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय, तसेच आयर्लंड ॲक्रेडेशन फोरमच्यावतीने प्रमाणित लिजेंड्री पीस अवॉर्ड कौन्सिल या शैक्षणिक विद्यापीठाची अबॅकस या गणितीय संकल्पनेतील मोजणीमधील हातच्याची अडचण सोडवणाऱ्या क्रांतीकारी संशोधनाबद्दल केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली पीएच.डी. पदवी नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सोहळ्यात पदवी मिळविलेल्या डॉ.सौ.कल्पना अशोक घडेकर- कार्ले आणि उत्कृष्ट संचलन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त अमोल बागूल यांचा मान्यवरांचे हस्ते गौरव करण्यात आला.
-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.