राजे उमाजी नाईक हे भारत देश स्वातंत्र्यासाठी 18 व्या शतकात इंग्रजाशी लढणारे आद्य क्रांतीवीर-गुणवंत एच.मिसलवाड


राजे उमाजी नाईक हे भारत देश स्वातंत्र्यासाठी 18 व्या शतकात
इंग्रजाशी लढणारे आद्य क्रांतीवीर-गुणवंत एच.मिसलवाड



नांदेड  -  भारत देशाच्या इतिहासात अनेक ऐतीहासीक घटना घडल्या. काहींची इतिहासात नोंद झाली तर काही क्रांतीविरांची दखलच घेतली गेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्य-विचारावर प्रभावित होवून 18 व्या शतकात ब्रिटीशांशी लढणारे थोर आद्यक्रांतीवीर म्हणजे नरविर राजे उमाजी नाईक हे होत, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.7 सप्टेंबर 2025 रविवार रोजी सकाळी ठिक 10.30 वाजता सशस्त्र क्रांतीचे प्रथम जनक, इतिहासातील शूर लढवय्या, आद्य क्रांतीवीर, नरविर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.



सर्व प्रथम रापम आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक मा.श्री.विष्णू हारकळ यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर नरविर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी आपल्या भाषणात बोलताना ते पुढे म्हणाले की, 1857 च्या उठावा अगोदर राजे उमाजी नाईक यांनी सलग 14 वर्षे ब्रिटीशांना सळो की पळो करून पळता भुई करून सोडले. व एक वर्षे जेलही झाली. जेलमधून सुटल्यानंतर आपल्या साथीदारांना सोबत घेवून इंग्रजांचा खजिना लुटून  सामान्य जनतेला रयतेला वाटला. आपल्या 41 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी रयतेची प्रामाणिक कार्य सेवा करून भारत देश स्वातंत्र्यासाठी आहुती दिली. अशा या महान क्रांतीकारकाचा इतिहास युवा पिढीसहीत सर्वांनीच अंगीकारून समाजाप्रती-देशाप्रती आदर्शयुक्त कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हरकळ, चार्जमन योगेश्वर जगताप, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, वाहतुक नियंत्रक सुनिल मोरे, आनंदा कंधारे, पाळी प्रमुख कैलास वाघमारे, संजय खेडकर, वरिष्ठ लिपीक सुरेश फुलारी, सौ.श्वेता तेलेवार,  आशा वाघमारे, शाम बैस, यांत्रीक प्रसाद गोंदगे, भांडार लिपीक गोविंद तेलंग, सेवक मारोती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमास रापम आगारातील कष्टकरी-कामगार कर्मचारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------------------------------------------





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.