त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचे महाराष्ट्रभरातून निषेध मुख्यमंत्र्यांकडे निवेदने देऊन दोषीवर कडक कारवाईची राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाने केली मागणी

 त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याचे महाराष्ट्रभरातून निषेध 
मुख्यमंत्र्यांकडे निवेदने देऊन दोषीवर कडक कारवाईची राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाने केली मागणी 




लोहा:- त्र्यंबकेश्वर नाशिक येथील  पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा  राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या वतीने  राज्यभरातून निषेध करण्यात आला. दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्याकडे निवेदनाच्या माध्यमातून  करण्यात आली आहे.


 त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला वृत्तपत्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी त्यांची वाहने पार्किंगला लावताना कर पावतीच्या संदर्भात वादावादी निर्माण होऊन पत्रकारांना खाजगी गुंडाकडून मारहाण करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर राज्यभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. आणि अशा या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत होती. या घटनेतील अनेक पत्रकार अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या वतीने  मा.तहसीलदार  यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यातील दोषीवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, राज्यभरामध्ये पत्रकारांच्या वाहनांना टोल आणि वाहन तळकर यातून सूट देण्यात यावी. आणि आगामी काळामध्ये  वाहन तळाचे खाजगी कंत्राटदार आणि पत्रकार यांच्यामध्ये वादावादी निर्माण होऊ नये. असे झाल्यास त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. 

 राष्ट्रीय बहुभाषिक पत्रकार संघाच्या  वतीने पत्रकार, सदस्य, पदाधिकारी यांच्या वतीने संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रा.लक्ष्मीकांत कस्तुरे, राज्य सचिव शेख मकबूल,राज्य उपाध्यक्ष,बालाजी धनसरे, चंद्रकांत वाघमारे मराठवाडा अध्यक्ष, बाळासाहेब बुध्दे , जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले.आणि राज्यात ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली. या आंदोलनामध्ये राज्यभरामधून मोठा प्रतिसाद मिळाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.