आमदार सुरेश धसांची जन्मभूमीत पेढेतुला; नवसपूर्ती साठी चिखली गाव एकवटले..

 आमदार सुरेश धसांची जन्मभूमीत पेढेतुला; नवसपूर्ती साठी चिखली गाव एकवटले..




आष्टी / प्रतिनिधी

विजयासाठी केलेला नवस, तो पूर्ण झाल्यावर होणारा आनंद आणि आपल्या लाडक्या नेत्याबद्दलचं प्रेम व्यक्त करण्यासाठी आष्टी तालुक्यातील चिखली गाव एका अभूतपूर्व सोहळ्यासाठी सज्ज झाले आहे. मराठवाडाभूषण आमदार सुरेश धस यांच्या विजयासाठी ग्रामदैवत श्रीलक्ष्मीमातेला घातलेले साकडे फेडण्यासाठी ग्रामस्थ त्यांची पेढेतुला करणार आहेत. हा आगळावेगळा नवसपूर्ती सोहळा आज, शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता लक्ष्मीमाता मंदिरासमोर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.



विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत, आपले सुपुत्र आमदार व्हावेत ही चिखली गावातील प्रत्येकाची इच्छा होती. याच भावनेतून गावातील रामदास शिंदे आणि विलास शिंदे या बंधूंनी, "सुरेश आण्णा आमदार झाल्यास त्यांची पेढ्यांनी तुला करू," असा नवस ग्रामदैवत लक्ष्मी आईला केला होता. देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या प्रेमाने आण्णा विजयी झाले आणि आता हा नवस पूर्ण करण्याची वेळ आली आहे.


या सोहळ्यानिमित्त गावात उत्साहाचे आणि मांगल्या चे वातावरण आहे. भागवत तांबे यांच्या वतीने देवीला १०१ नारळांचे तोरण बांधून कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच, या आनंदाच्या क्षणी संपूर्ण गावाने एकत्र यावे यासाठी सुनील रत्नाकर कुलकर्णी यांनी गावजेवणाचे आयोजन केले आहे.


आमदार सुरेश धस यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने होणार असून, या पेढेतुला सोहळ्यास आणि स्नेहभोजनास सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लोकनेते आ. सुरेश अण्णा धस प्रतिष्ठान'च्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण चिखली गाव आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी एकवटले आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.