पंचनामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी सरसकट मदत द्यावी - मा.आ. भिमरावजी धोंडे
नुकसान ग्रस्तांच्या मदतीसाठी मा.आ.भिमराव धोंडे देणार १ महिन्याची पेंशन
आष्टी प्रतिनिधी - विधानसभा मतदार संघातील २१ महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे एक लाख एकर पेक्षा जास्त पिकांचं मोठे नुकसान झाले असून जमिनी खरडुन गेल्या आहेत.पिके पाण्याखाली गेली, घरे पाण्याखाली गेली व पशुधन दगावले. ५ नागरीकांचा मृत्यू झाला सर्व च मंडळात अतिवृष्टी झाली असून शेतक-यांचा दिवाळी पूर्वी शिमगा झाला आहे.बळीराजाची आयुष्यभराची कमाई या पुराने वाहुन गेली आहे.माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आमच्या भागात पावसाने थैमान घातलेले पाहिले आहे.या बळीराजाला उभारी देण्यासाठी दिवाळी पूर्वी ज्या संपुर्ण जमिनी वाहून गेल्या आहेत त्यांना हेक्टरी दोन लाख रूपये मदत, फळबागांना हेक्टरी ५० हजार रुपये इतर पिकांना हेक्टरी १७ हजार रुपये बुजलेल्या विहीरींना ५ लाख रुपये २ हेक्टर अट रद्द करुन जेवढा सातबारा तेवढा मावेजा,मयत व्यक्तीच्या वारसांना १० लाख रुपये मदत तात्काळ देण्याची मागणी मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी आष्टी येथील भगवान महाविद्यालयात मंगळवारी सायं ६.३० वा. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्त भागातील नागरिकांना मदत म्हणून १ महिन्याची पेंशन देणार असल्याचे सांगितले पुढे बोलताना मा.आ.भिमराव धोंडे म्हणाले की आष्टी विधानसभा मतदार संघातील २१ महसूल मंडळात मी पाहणी केली असता अतिवृष्टीमुळे एक लाख एकरापेक्षा जास्त पिकांचं अंदाजे ४०० ते ५०० कोटी रु चे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.ज्या संपुर्ण जमिनी वाहून गेल्या आहेत.त्यांना हेक्टरी दोन लाख रूपये मदत तर ज्या शेतकऱ्यांच्या विहीरी बुजल्या आहेत. त्यांना पाच लाख रुपये अनुदान द्यावे, फळबागेसाठी २२ हजार रुपये मावेजा दिला जातो तो तुटपुंजा असून ५० हजार रुपये हेक्टरी फळबागेसाठी व तर इतर पिकांना ८ हजार ५०० रुपये सरसकट ऐवजी १७ हजार रुपये मावेजा हेक्टरी द्यावा,दोन हेक्टर ची अट रद्द करून शेतकऱ्याचा जेवढा सातबारा आहे.तेवढा मावेजा देण्यात यावा इतर राज्यांमध्ये ही अट नसून आपल्याकडेही इतर राज्यांप्रमाणे जेवढा सातबारा तेवढा मावेजा देवा.गाई म्हशींना दिला जाणारा मावेजा तुटपुंजा असून एक गाई असो किंवा म्हैस,बैल प्रत्येकी ७५ हजार रुपये मदत तर शेळी साठी प्रत्येकी १५ हजार रुपये मदत द्यावी तसेच अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला तात्काळ शासनाने १० लक्ष रुपये मदत देण्यात यावी तसेच आष्टी मतदार संघात पुरग्रस्त स्थिती असून आणखी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे.शासनाने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात वेळ घालण्यापेक्षा दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टीचा इशारा असलेल्या भागात जीवित आणि वित्तहानी रोखण्याच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलावेत असंही मा.आ.भिमराव धोंडे यांनी सांगितले आहे.
__________
नुकसान ग्रस्तांच्या मदतीसाठी मा.आ.भिमराव धोंडे यांनी दिली ५ वेळा पेन्शन
मतदार संघात ज्या ज्या वेळेस आपत्ती आली त्यावेळ मा.आ.भिमराव धोंडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नुकसान ग्रस्तांना मदत व्हावी यासाठी आमदार असताना पगार व माजी आमदार असताना पेन्शन अशाप्रकारे ५ वेळा मदत केली असून सद्यस्थितीत होत असलेल्या अतिवृष्टीने नुकसान ग्रस्तांना मदत व्हावी यासाठी १ महिन्याची ८० हजार रुपये पेन्शन जिल्हाधिकारी यांच्याकडे १ ते २ दिवसांत सुपूर्द करणार आहेत.
stay connected