व्यापारी असोसिएशनची आपत्तीग्रस्तांना साडेतीन लाखाची मदत
-----------------------
किराणा दुकानदारांच्या मदतीला व्यापारी संघ धावून आला
-----------------------
कडा / वार्ताहर
-------------------
येथील व्यापारी असोसिएशनच्या वतीने आपत्तीग्रस्त अनेक किराणा दुकानदारांना साडेतीन लाखाची रोख स्वरूपात मदत करून संकटात मदतीचा हात दिल्याने दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आष्टी तालुक्यात मागील आठवड्यात महापूर सदृश्य मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे अनेकांना या महापुराचा मोठा आर्थिक फटका बसला. त्यामध्ये काही किराणा दुकानदारांचे पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा आपत्तीग्रस्त किरणा दुकानदारांना कडा व्यापारी असोसिएशनने मदतीचा हात देऊन जवळपास नुकसानग्रस्त सहा ते सात दुकानदारांना साडेतीन लाखाची रोख स्वरूपात मदत करून दिलासा दिला. आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देणारे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नागेश कर्डिले, गणेश कटारिया, नितीन शिंगवी, सागर श्रीश्रीमाळ, वेदांत देशमुख, अमित राठोड, वसंत चोरबले, सुरेश राठोड, प्रकाश श्रीश्रीमाळ, संदीप चानोदिया, हेमंत मेहेर, प्रीतम कटारिया, अखिलभाई, खेतेश्वर राजस्थानी, संजय कर्डिले, ललित कटारिया, सचिन गांधी, मुन्ना रावळ, आर के कोल्ड्रिंक इत्यादी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन नुकसानग्रस्तांना सर्वप्रथम मदतीचा हात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
---------%%-----------
stay connected