आ. सुरेश धस यांच्या हस्ते श्रुंगेरी देवीच्या सातव्या माळेला आरती
************************
*************************
आष्टी (प्रतिनिधी)
नवरात्री हा देवी उपासनेचा पवित्र उत्सव म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आणि श्रद्धा, सत्त्व व संस्कारांचा संगम आहे. या पावन परंपरेला सन्मान देत आमदार सुरेश धस यांनी ब्रम्हगाव येथील श्रुंगेरी देवीच्या सातव्या माळेच्या निमित्ताने उपस्थित राहून देवीची मनोभावे आरती केली.
या प्रसंगी आमदार सुरेश धस यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. देवस्थान ट्रस्टतर्फे आमदार धस यांचा सन्मान करण्यात आला.
नवरात्रीच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यास यावेळी
सरपंच रोहिदास पवार,भाऊसाहेब निंबाळकर, ट्रस्ट अध्यक्ष फौजी विजय हराळ,पुजारी मारुती सानप,भाऊसाहेब पवार, उपसरपंच सचिन हराळ,डॉ.संदीप सानप,शिवाजी सानप,संजय हराळ,सतीष पवार,मारुती बबन पवार,मुकेश आगलावे, नवनाथ नवसुपे,राहुल जमदाडे, साहेबराव वायकर,कल्याण निंबाळकर, गौरव निंबाळकर, बाळू गवारे,बाबू गवारे,अंबादास पवार,संभाजी हराळ यांच्यासह भाविक भक्तमंडळी, ग्रामस्थ तसेच महिला, युवक व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected