अमोलक ऋषींच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न शिबिरात १०५ दात्त्यांनी केले रक्तदान

 अमोलक ऋषींच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
शिबिरात १०५ दात्त्यांनी केले रक्तदान



-----------------------

राजेंद्र जैन /कडा 

---------------

जैनाचार्य अमोलक ऋषींच्या पुण्यतिथीनिमित्त अमोलक जैन शिक्षण संस्थेत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १०५ दात्त्यांनी रक्तदान केले.


कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक जैनाचार्य अमोलक ऋषीजी म सा यांच्या ८९ व्या पुण्यतिथी निमित्ताने शनिवारी  रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम आयोजित केले होते. सकाळी सर्व विद्या शाखातील विद्यार्थ्यांनी गावातून फेरी काढली.  त्यानंतर मोतीलाल कोठारी विद्यालयात विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. गांधी महाविद्यालयात सिटी ब्लड बँक बीड आणि गांधी नर्सिंग विद्यालय यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात शिक्षक , प्राध्यापक यांच्यासह इतर नागरिकासह सुमारे १०५ दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

--------%%-------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.