पांडुरंग गाडे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कडा प्रतिनिधी - वर्धमान महावीर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महावीर इंग्लिश स्कूल कडा या सीबीएसई बोर्ड मान्यता प्राप्त शाळेचे चित्रकला शिक्षक श्री. पांडुरंग गाडे गेली १३ वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे या संस्थेत काम करत आहे . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना बीड जिल्हा सीबीएसई सहोदया स्कूल्स कॉम्प्लेक्सचा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला होता त्याचे वितरण शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या दिमाखात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापिका स्नेहलताई पाठक (अध्यक्ष संस्कार भारती देवगिरी विभाग) त्याच बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अर्चना पवार , डॉ. सुशिल लोढा, प्रा . अन्वर शेख आणि प्रा. शितल सर्वज्ञ इ . मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष- श्री अमितजी राठोड, उपाध्यक्ष- श्री. संदिपजी चानोदीया, सचिव - श्री. हेमंतजी मेहेर, कोषाध्यक्ष- श्री डॉ. प्रमोदजी भळगट तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.



stay connected