घरात कुणी नसल्याची संधी साधून 'दिवसा घरफोडी'
-----------------------------------
अंदाजे दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी
-------------------------
कडा /वार्ताहर
-------------------
तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केळ गावाच्या परिसरात शेतकरी कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतातील कामासाठी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी दुपारी घर फोडल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले केळ येथील मच्छिंद्र साधू दळवी शेतकरी कुटुंबीय शनिवारी दुपारी घराला कुलूप लावून शेतीच्या कामासाठी शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरात कोणीच नसल्याची संधी साधून घरफोडी केली. घरातील कपाटामधील अंदाजे दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याचे निर्दशनास आले. याबाबत अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया चालू होती. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांसह अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे, बीडचे श्वान पथक, अंगुली निर्देश तज्ञांनी भेट दिली. पुढील तपास अंभोरा पोलीस करीत आहेत.
------%%------


stay connected