दुकानांत शिरले पावसाचं पाणी,
राम ॲटोमोबाईल्स ॲन्ड सर्व्हिसींग सेंटरचे अतोनात नुकसान.
लोहा:- चंद्रकांत वाघमारे
लोहा शहरातील राम ॲटोमोबाईल्स ॲन्ड सर्व्हिसींग सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा पावसाचे पाणी शिरल्याने या दुकानातील महागड्या वस्तू सह पाच मोटारसायकलचे स्प्रेअर पार्ट, वांशिक मशिन,रॅम या सह इतर वस्तू पावसात भिजून साधारणतः आठ ते दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे राम ॲटोमोबाईल्स ॲन्ड सर्व्हिसींग सेंटरचे संचालक रामप्रसाद नागोराव माईदळे यांनी सांगितले.
रस्त्याची असमान उंची, बुजलेले पावसाळी गटारांचे आउटलेट, पावसाळ्यापूर्वी योग्य प्रकारे न केलेली या गटारांची स्वच्छता आदी कारणांनी झालेल्या पावसामुळे लोहा शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
त्या प्रमाणे तालुक्यातील निळा येथिल तालुक्याच्या ठिकाणी एजा करन्या साठी आसनारा नदिवरील मुख्य सिंमेंन्ट पुल असनारा पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेल्याने निळा वाशियांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
त्यामुळे शासन प्रशासन व बांधकाम विभाग काय कार्यवाही करेल याची नागरिकात चर्चा होत असल्याचे दिसून येते आहे
stay connected