आष्टीकरांसाठी अभिमानाचा क्षण.!मिर्झा अरहान मुर्तजा बेग यांची भारत सरकारच्या नामांकित NIT मध्ये रिसर्च सायंटिस्ट इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी निवड

 आष्टीकरांसाठी अभिमानाचा क्षण.! 



आष्टी शहरातील मिर्झा अरहान मुर्तजा बेग यांची भारत सरकारच्या नामांकित NIT मध्ये रिसर्च सायंटिस्ट इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. 

घरची साधी परिस्थिती, वडील मजूर आणि आई गृहिणी असूनही जिद्द, मेहनत आणि पालकांच्या आशीर्वादाच्या जोरावर अरहानने हे यश संपादन केले आहे. 



त्याची निवड ही आष्टी तालुक्याचा अभिमान असून इतर तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचा आष्टी येथे नगरपंचायतच्या वतीने  युवा नेते सागर धस यांच्या हस्ते सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शहराचे नगराध्यक्ष यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.