डॉ. महेंद्र वैरागे यांचे 'भारतीय सामाजिक समस्या' हे पुस्तक विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरावे – किशोर हंबर्डे

 डॉ. महेंद्र वैरागे यांचे 'भारतीय सामाजिक समस्या' हे पुस्तक विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून वापरावे – किशोर हंबर्डे



आष्टी (प्रतीनीधी), १८ ऑगस्ट – “डॉ. महेंद्र वैरागे यांचे भारतीय सामाजिक समस्या हे पुस्तक विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते न ठेवता, एक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरावे,” असे प्रतिपादन आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा किशोर हंबर्डे यांनी केले.


ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालयात आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै ॲड बी डी हंबर्डे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात  ते बोलत होते. सामाजिक वास्तवाची सखोल समज विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी अशा प्रकारचे साहित्य महत्त्वाचे ठरते, असे सांगताना किशोर हंबर्डे म्हणाले, “भारताच्या सामाजिक रचनेतील गुंतागुंतीच्या समस्यांचे विश्लेषण डॉ. वैरागे यांनी अभ्यासपूर्वक आणि सोप्या भाषेत मांडले आहे. त्यामुळे हे पुस्तक पदवी, पदव्युत्तर आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.”


या ग्रंथात जातीव्यवस्था, लिंगभेद, शिक्षणातील असमानता, बेरोजगारी, दारिद्र्य अशा महत्त्वाच्या विषयांचा वेध घेतला असून, सैद्धांतिक बाबींप्रमाणेच वस्तुनिष्ठ दृष्टिकोनही ठेवण्यात आला आहे. यामुळे केवळ परीक्षेच्या तयारीपुरते नव्हे, तर सामाजिक भान जागृत करण्यासाठीही हे पुस्तक मोलाचे ठरते, असे त्यांनी नमूद केले.


कार्यक्रमाला आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर हंबर्डे, उपाध्यक्ष दिलीप वर्धमाने , सचिव अतुल शेठ मेहर, कोषाध्यक्ष डॉ गणेश पिसाळ,प्रा व्ही.एल.शिंदे ,प्रा महेश चवरे, रिद्धी किशोर हंबर्डे प्राचार्य डॉ सोपानराव निंबोरे उपप्राचार्य बाबासाहेब मुटकुळे प्रा अविनाश कंदले पिंपळेश्वर इंग्लिश स्कूल प्राचार्य सायली हंबर्डे,विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या पुस्तकाची उपयुक्तता मान्य करत त्याचा अभ्यासक्रमात वापर करण्याचा संकल्प केला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.