प्रा . मधुकर राळेभात यांचा वाढदिवस म्हणजे सर्व पक्ष आणि समाज मनाने केलेलं प्रेम आहे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे

 *. प्रा . मधुकर राळेभात यांचा वाढदिवस म्हणजे सर्व पक्ष आणि समाज मनाने केलेलं प्रेम आहे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे* 

------------------------------------------------------------





 *जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण )* 


     जामखेड - प्रा.मधुकर (आबा) राळेभात यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रातील प्रवास अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी आहे. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य करताना त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या जीवनात क्रीडा, ज्ञान, संस्कार आणि मूल्यांचे बीजारोपण केले. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासातच नव्हे तर समाजाभिमुख विचार करण्याची दृष्टी दिली. त्यांच्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असंख्य कार्यकर्ते वाढदिवसानिमित्त आले आहेत ही त्याची पोचपावती आहे.प्रा. मधुकर राळेभात यांचा वाढदिवस म्हणजे सर्व पक्ष आणि समाज मनाने केलेलं प्रेम आहे. राळेभात यांचा वाढदिवस आनंदाचा सोहळा न राहता समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस आहे असे 

प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी केले. 


भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांचा ६३ वा वाढदिवस महावीरभवन येथे सोमवारी रात्री साजरा करण्यात आला. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. 



     यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड अरूण जाधव, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, आजीनाथ हजारे, डॉ. भगवान मुरूमकर, रवींद्र सुरवसे, मनोज कुलकर्णी, नगरसेवक अमित चिंतामणी, अमित जाधव, बापूराव ढवळे, प्रवीण घुले, दत्तात्रय वारे, शहाजीराजे भोसले, खर्डा सरपंच संजीवनी पाटील, अजहर काझी, राहूल उगले, वसीम बिल्डर ;आकाश बाफना, संध्या सोनवणे आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. 


          यावेळी बोलताना विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे म्हणाले, प्रा. मधुकर राळेभात जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि शेतकरी कल्याण या सर्वच क्षेत्रांत प्रभावी योगदान दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक गावांच्या विकासाला गती मिळाली. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २०० जणांनी मोफत आरोग्य तपासणी व ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन सामाजिक बांधिलकीची जाणीव जपली. या उपक्रमामुळे त्यांचा वाढदिवस केवळ आनंदाचा सोहळा न राहता, समाजासाठी कल्याणकारी कार्याचा दिवस ठरला.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास, भारतीय जनता पार्टीसह विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध संस्थेचे आजी - माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, जामखेड ग्रामस्थ व प्रा.मधुकर आबा राळेभात यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.


        प्रा. मधुकर राळेभात व मी यापूर्वी प्राध्यापक होतो. राजकीय पक्ष जरी वेगळे असले तरी राजकारणात बरोबर होतो. पण २००९ ला ते माझ्या विरोधात विधानसभेला उभे राहून जामखेड तालुक्यातून तीन हजार मते जास्त घेतले यावरून त्यांचा जनतेप्रती असलेले प्रेमाचे नाते चांगले होते. तीन वर्षांपूर्वी मी त्यांच्या वाढदिवसाला न बोलवता घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या तर दुसऱ्या वेळी ते माझ्या बरोबरच आले आणि आता तर ते संबध आणखी दृढ झाले. 


     मी पहिल्यांदा आमदार दुसर्‍यांदा मंत्री व तिसऱ्या वेळी पडलो पण वरिष्ठ पातळीवर असलेले राजकीय संबध यामुळे विधानपरिषदेचे सभापती पद मिळाले. विधानपरिषदेचा मी सातवा व कमी वयात झालेला सभापती आहे.


      

 *. कै .साहेबराव आबा नंतर प्रा .मधुकर आबा* 


  दिवंगत नेते साहेबराव (आबा) पवार पाटील यांच्या नंतर कुठल्या एका नेत्यांसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि समाजातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आपले प्रेम व्यक्त करतात असा अनुभव कै .साहेबराव आबा पवार पाटील यांच्या नंतर प्रा मधुकर आबा राळेभात यांच्या सोहळ्याने आला.  


                     


 *सभापती राम शिंदेंचा मोठेपणा* 


     २००९ विधानसभेला जामखेड मधून तीन हजार मते माझ्यापेक्षा जास्त प्रा मधुकर आबा राळेभात यांना मिळाली होती. असे मोकळ्या मनाने सभापती प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले . सभापती राम शिंदे यांचा मनाचा मोठेपणा यातून दिसून आला .

       


     

 - भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात व विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा एकत्र सत्कार कार्यकर्त्यांनी केला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.