संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रा शशिकांत कन्हेरे यांची निवड

 संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रा शशिकांत कन्हेरे यांची निवड



आष्टी। प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेडच्या बीड जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेडची मुलूख मैदानी तोफ प्रा शशिकांत कन्हेरे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश प्रवक्ते गंगाधर बनबरे व सर्व प्रदेश कार्यकारिणीच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र पुणे येथील पंडीत जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात जिल्हा अध्यक्ष पदगृहन सोहळ्याच्या कार्यक्रमात फेड निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात सतत अग्रेसर राहणा-या प्रा कन्हेरे यांची पुन्हा बीड जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने बीड जिल्हयात आनंद व्यक्त केला जात आहे. 

मराठवाडासह बीड जिल्ह्यात संभाजी ब्रिगेडचा विचार सर्वदूर पोहोचविला असे.प्रा शशिकांत कन्हेरे यांनी सामाजिक बांधिलकी मानून केलेले कार्य तसेच ते अनेक वर्षांपासून पुरोगामी चळवळीत सक्रिय आहेत. त्यांची सामाजिक व राजकीय वाटचाल या सर्व कार्याची दखल घेऊन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे यांनी प्रा शशिकांत कन्हेरे यांची पुन्हा एकदा बीड जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करून त्यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान आपल्या निवडीविषयी आभार मानून बोलताना प्रा शशिकांत कन्हेरे यांनी सांगितले की,संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढीवर भर देणार आहोत. समाजातील प्रश्न सोडविणार आहोत.तसेच सामान्य माणसांवर होणा-या अन्याय-अत्याचारा विरूद्ध लढण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून २४ तास जनसेवेसाठी उपलब्ध असेन असे नवनिर्वाचित बीड जिल्हाध्यक्ष प्रा शशिकांत कन्हेरे यांनी सांगितले.त्यांच्या या निवडीबद्दल मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व आदींनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.