सकाळी निवेदन दिले दुपारी प्रश्न लागला मार्गी १५ आँगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या निषेध लोटांगणला स्थगिती - रहेमान सय्यद

 सकाळी निवेदन दिले दुपारी प्रश्न लागला मार्गी 
१५ आँगस्ट रोजी करण्यात येणाऱ्या निषेध लोटांगणला स्थगिती - रहेमान सय्यद 


कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील  साबलखेड कडा आष्टी रस्त्यांचे काम दोन वर्षांपासून चालू असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारी बनवतांना गटारीला पावसाचे पाणी जाण्यासाठी जागोजागी चार-चार इंचाची छिद्रे ठेवली होती.परंतु रस्ता बनवतांना ते सगळेच्या सगळे छिद्रे रस्त्यात बुजून टाकली. परिणामी दावलमलिक (शादवल) दर्गा समोर ५० फुटापेक्षा जास्त लांबीचे व २० फुटाच्या आसपास रूंदीत पावसामुळे कायमच चिखल - पाण्याचे ढव साचून राहत होते.त्यामुळे ये-जा करतांना कसरत करावी लागत होती.तर घसरून पडण्याची भिती, अपघाताची भिती यावर उपाययोजना करावी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रहेमान सय्यद यांनी वेळोवेळी अभियंता भोपळे सह संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना फोटो व्हिडिओ पाठवून संपर्क करून यावर लवकर उपाययोजना करावी म्हणून विनंत्या केल्या होत्या परंतु दखल घेतली नाही. म्हणून १२ आँगस्ट २०२५ रोजी लेखी निवेदन देऊन आजपर्यंत दखल घेतली नाही याचा निषेध म्हणून १५ आँगस्ट २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११:३० वाजता दर्गा समोर साचलेल्या चिखल-पाण्यात भोपळा,बेशरम घेऊन १५ मिनिंटे लोटांगण घेत निषेध व्यक्त करणार असल्याचे निवेदन १२ आँगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दिले आणि चमत्कार झाला. निवेदन सकाळी ११ वाजता दिले आणि काम दुपारी ३ वाजता करून दिले. इतक्या दिवसांपासून जो प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभियंता व संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती करण्यात येत होती. वृत्तपत्रातून याप्रकरणी बातम्या छापून आल्या होत्या तर दखल घेतली असे दाखवत ग्रेडर वाहनने चिखल पाणी हटवत थातूरमातूर काम करून वेळ काढूपणा काम केले होते. परंतु एका निवेदनाद्वारे सकाळी विनंती केली आणि त्या निवेदनाची दखल घेत दुपारी प्रश्न मार्गी लावला म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रहेमान सय्यद यांनी निवेदन दिलेल्या सर्व अधिकाकाऱ्यांना निवेदनाची दखल घेऊन काम करून दिले प्रश्न मार्गी लावला म्हणून १५ आँगस्ट २०२५ शुक्रवार रोजी होणाऱ्या निषेध लोटांगणला स्थगिती देत असल्याचे लेखी कळविले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.