सेवा निवृत्त मेजर औदुंबर सहस्त्रबुद्धे यांचे वृद्धापकाळाने निधन..
आष्टी ( प्रतिनिधी)
आष्टी येथील मूळ रहिवासी सध्या अहिल्यानगर येथे स्थायिक असलेले मेजर औदुंबर धोंडोपंत सहस्त्रबुद्धे यांचे दि.05 ऑगस्ट 2025 रोजी वर्धापकाळाने 85 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले..
अहिल्यानगर येथील अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले
मेजर औदुंबर धोंडोपंत सहस्त्रबुद्धे यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टी येथे झाले त्यानंतर तात्कालीन औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजी नगर येथे मिलिंद महाविद्यालयामध्ये बीएससी पर्यंतचे शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन जीवनात एनसीसी चे सीनियर अंडर ऑफिसर पदी काम केल्यामुळे सैन्य दलाची आवड निर्माण झाली होती त्यामुळे सन 1965 च्या भारत पाक युद्धापूर्वी काही वर्ष अगोदर सैन्य दलामध्ये अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इमर्जन्सी कमिशन प्राप्त केले होते.. त्याचे प्रशिक्षण आय एम ए डेहराडून येथे पूर्ण केल्यानंतर त्यांची सेकंड लेफ्टनंट पदी नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर पदोन्नतीने कॅप्टन आणि नंतर मेजर पदी काम करण्याची संधी मिळाली सैन्य दलामध्ये सीमेवर लेह लडाख, मध्यप्रदेश, बिहार, हरियाणा या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे सन 1971 च्या भारत पाक युद्धामध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या माजी सैनिकांकरता असलेल्या सेवेत दाखल होऊन त्यांना एनसीसी विभागात मेजर पदी नियुक्ती मिळाली त्यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी नगर आणि अहमदनगर या ठिकाणी काम केले अहिल्यानगर येथे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी जामखेड रस्त्यावरील सैन्य अधिकारी वसाहतीमध्ये ते स्थायिक झाले त्यांच्या मागे पत्नी दोन मुले नातवंडे असा परिवार आहे


stay connected