विद्यार्थीनींकडुन मांडवा येथे बोर्डेक्स पेस्टचे यशस्वी प्रात्यक्षिक शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर

 विद्यार्थीनींकडुन मांडवा येथे बोर्डेक्स पेस्टचे यशस्वी प्रात्यक्षिक 
शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर



आष्टी प्रतिनिधी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत श्री. छत्रपती शाहु फुले आंबेडकर कृषि महाविद्यालय आष्टी येथील कृषीकन्यांनी मौजे मांडवा येथे ग्रामस्थांसाठी बोर्डेक्स पेस्ट प्रात्यक्षिकाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमात कृषिकन्यांनी गावकऱ्यांना बोर्डक्स पेस्ट कसे तयार करावे, त्याचे फायदे आणि शेतीत त्याचा प्रभावी वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती दिली.बोडेक्स पेस्ट हे पिकांसाठी एक महत्त्वाचे बुरशीनाशक असून, ते पिकांचे विविध रोगांपासून संरक्षण करून उत्पादन वाढीस हातभार लावते. विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे हे पेस्ट तयार करण्याची पद्धत समजावून सांगितल्याने गावकऱ्यांनी त्यात विशेष रुची दाखवली. अनेक शेतकऱ्यांनी या प्रात्यक्षिकाचा उपयोग करून आपल्या शेतात बोर्डक्स पेस्ट तयार करून वापरण्याची तयारी दर्शवली. यामुळे त्यांच्या कृषी ज्ञानात भर पडल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले. हा उपक्रम गावकऱ्यासाठी अत्यंत लाभदायक ठरला असून,यामुळे त्यांचे शेतीतले ज्ञान अधिक प्रगल्भ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरसुळ एस.आर. कार्यक्रम समन्वयक प्रा. तांबोळी आय.एम, उपक्रमाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.शिंदे एस.ए., आणि विषय विशेषज्ञ प्रा.साबळे एम.व्ही. यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी कृषीकन्या आंधळे ऋषिका, ढेकळे कादंबरी, रानवळकर पल्लवी, गुंड शिवानी, पठाण सफिया, राखे अंकिता, घेवंदे पुनम, जाधव ऐश्वर्या उपस्थित होत्या. कृषीकन्यांनी दाखवलेल्या या सक्रिय सहभागामुळे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यीनींच्या योगदानाला प्रोत्साहन मिळाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.