आतिक उर्फ अकिब मोहम्मद शेखचा जामीन अर्ज अखेर रद्द, आता पोलीसांची भूमिका काय, कधी मुसक्या आवळणार ?

आतिक उर्फ अकिब मोहम्मद शेखचा जामीन अर्ज अखेर रद्द, आता पोलीसांची भूमिका काय, कधी मुसक्या आवळणार ?



नगर (प्रतिनिधी)- गुटखा विक्रीचे रॅकेट चालविणाऱ्या व अनेक गुन्हे दाखल असताना फरार असलेल्या अतिक उर्फ अकिब मोहंमद शेख याला अटक करण्याची मागणी वारंवार होत असतांना आता जिल्हा व सत्र न्यायालयाने आतिक उर्फ अकिब मोहम्मद शेख याचा अटकपूर्व जामीन रद्द केला आहे.

पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने  शहरात धडाकेबाज कारवाई करत अवैध धंदे चालवणाऱ्या अनेक भामट्यांना जेरबंद केले होते.मात्र आतिक उर्फ अकिब मोहम्मद शेख पोलिसांना गंडवन्यात यशस्वी झाला असून त्याला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले होते.

गुटखा विक्रीच्या रॅकेट मधील सर्व आरोपी अटक झालेले असताना हा एकमेव आरोपी फरार असल्याबाबत अनेकांनी पोलिसांचे लक्ष वेधले होते. 

अतिक उर्फ अकिब मोहंमद शेख याच्यावर गुटखा विक्री प्रकरणी  गुन्हे दाखल आहेत. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द केला आहे. त्यामुळे आता पोलीस पथक आतिकच्या मुसक्या अवळणार कि लगे राहो मुन्नभाई च्या अवस्थेत राहणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.