अमेरिकेचा भारताला आयात शुल्क कराचा झटका America India

 *अमेरिकेचा भारताला आयात शुल्क कराचा झटका*. 



✍🏻 


       *युन्नूस तांबोळी अकलूज*.
           ९८६०२६६४००.

        अमेरिकेने भारतावर लादलेल्या पंचवीस टक्के आयात शुल्क 27 ऑगस्ट पासून लागू होणार आहे या आयात शुल्कावर चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि भारत यांची 25 ते 29 ऑगस्ट पर्यंत चर्चा होणार होती; 'मात्र ट्रम्प ने ही बैठक पुढे ढकलली; यामुळे भारताची चिंता वाढलेली आहे .यापूर्वी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान पाच बैठका संपन्न झाल्या; होत्या यात मात्र भारताच्या हाती काहीही लागलेले नाही. अमेरिकेची अर्थव्यवस्था जगात 25% इतके आहे यामुळे त्यांचा ग्राहक बाजार पेठेत सिंहाचा वाटा राहणार. 

अमेरिकेतील लोकांची उच्च दर्जाचे राहणीमान असल्याने उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होत आहे . अमेरिकी लोक जास्त वस्तू खरेदी करतात आणि आयातीत वस्तूंना त्यांची अधिक मागणी असते साहजिकच खर्च वाढत असल्याने आयात शुल्क वाढविले तरी तूट फारशी कमी होणार नाही ;अमेरिकेच्या  कमी बचत धोरणामुळे त्यांना देशाबाहेरून उसनवारी करावी लागते; त्यामुळे व्यापार तूट वाढते परिणामी परदेशाकडून कर्ज काढावे लागते; त्यांनी परदेशी लोकांकडून घेतलेल्या कर्जाचा वाटा 25% आहे तो फेडण्यासाठी ट्रम्पचा आयात शुल्कचे हे कारस्थान आहे.

         भारताप्रमाणे चीनलाही आयात शुल्कचा झटका दिला चीन रशियाकडून भारतापेक्षा अधिक खनिज तेल आयात करत असला तर तरी भारतावर घातलेल्या 50 टक्क्यांच्या दंडात्मक शुल्काप्रमाणे त्यांनी चीनवर शुल्क लादलेला नाही हा पक्का दांभिकपणा आहे चीन अमेरिकेच्या या धमकीला कधीही घाबरणार नाही याची जाणीव अमेरिकेला आहे ‌‌.

         चीन किंवा ब्राझीलकडून जे सुरू आहे त्याप्रमाणे अमेरिकेला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याला भारताकडे कोणते मार्ग नाहीत ना कोणती शक्ती स्थाने   आहेत चीन काही प्रमुख निर्यातीवर बंदी घालू शकतो पण पण भारत सामान्य औषधांच्या निर्यातीवर बंदी घालू शकत नाही; कारण अमेरिका ला भारत औषध पुरवठा करत असला तरी भारतापेक्षा कमी किमतीत अमेरिकेला औषध पुरवठा करणारे इतर  स्पर्धक देश आहेत याची जाणीव अमेरिकेला आहे. 

       ट्रम्प यांनी इतके आयात शुल्क लादले म्हणून भारतानेही अमेरिकेवर तितके शुल्क आकाराचे या प्रकारचे प्रत्युत्तर चीन सारख्या    देशाने दिला मात्र भारताने देण्याच्या फंदात पडू नये किंबहुना अशा फंदात न पडलेले बरे असे भारतातील मोठ मोठे विश्व विश्लेषक देखील सांगतात. 

       अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी मित्र देश अनेक वर्षापासून आहे: तर अमेरिकेकडे निर्यात करणाऱ्या मोठ्या देशापैकी भारताचा दहावा क्रमांक लागतो. भारतापेक्षा मेक्सिको कॅनडा जर्मनी अगदी चीन मधून हे अमेरिकेकडे जास्तं माल* निर्यात होतो; त्यामुळे भारतासारख्या देशातून होणारी आयात घटल्यामुळे अमेरिकी  अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमीच आहे. 

       ट्रम्प च्या आढमुठ धोरणापुढे भारताने आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवावे लागेल हे मान्य याचा अर्थ आपण जशास तसे उत्तर देऊ शकत नाही. यासाठी भारताने सबुरीने घ्यावे .हे ही तितकेच खरे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.